Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड

Study Reveals Birds Also Masturbate: माणसांप्रमाणे पाळीव पक्षी देखील हस्तमैथुन करत असल्याची आश्चर्यचकीत करणारी माहिती संशोधनातून उघड झाली आहे. या अभ्यासातून नेमकी काय माहिती समोर आली ती घ्या जाणून...
Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड
Birds MasturbationSaam Tv
Published On
  • हस्तमैथुन हे पक्ष्यांमध्येही सामान्य वर्तन आहे

  • नव्या संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड

  • सुमारे ५५ टक्के नर आणि ३६ टक्के मादी पक्ष्यांमध्ये हे वर्तन नोंदवले गेले

  • जंगली पक्ष्यांमध्ये हे वर्तन पिंजऱ्यातील पक्ष्यांपेक्षा अधिक प्रमाणात आढळले

हस्तमैथुन हा शब्द ऐकल्यावर काही जण नाक मुरडतात आणि काही जण त्याबद्दल बोलणं टाळतात. पण देशातील नामांकित डॉक्टरांच्या मते ही एक सामान्य क्रिया आहे. अनेक समाजांमध्ये याबद्दल अनेक गैरसमज आहेत. पण हस्तमैथुनावर काही शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. या संशोधनातून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हस्तमैथुन केवळ माणसांमध्येच नाही तर पक्ष्यांमध्येही सामान्य आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हे वर्तन ५५ टक्के नर पक्ष्यांमध्ये आणि ३६ टक्के मादी पक्ष्यांमध्ये दिसून आले आहे. यापूर्वी डॉल्फिन, चिंपांझी, पेंग्विन आणि सागरी इग्वाना हे हस्तमैथुन करतात ही माहिती समोर आली.

'इकॉलॉजी अँड इव्होल्यूशन' या जर्नलमध्ये लँकेशायर विद्यापीठाच्या उत्क्रांतीवादी पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. क्लोई हेस यांनी केलेल्या अभ्यासानुसार, पक्ष्यांमध्ये हस्तमैथुन केवळ सामान्यच नाही तर ते त्यांच्या नैसर्गिक लैंगिक वर्तनाचा एक भाग आहे. या अभ्यासात असे आढळून आले की, हे वर्तन फक्त नर पक्ष्यांपुरते मर्यादित नाही. मादी पक्ष्यांमध्येही हस्तमैथुनाची अनेक उदाहरणे आढळून आली आहे. संशोधकांनी पूर्वीचे संशोधन, पक्षीपालक आणि ऑनलाइन समुदायाकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. या अभ्यासानुसार, नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये हे वर्तन सुमारे ५५ टक्के नर पक्ष्यांमध्ये आणि ३६ टक्के मादी पक्ष्यांमध्ये दिसून आले आहे.

Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड
Flightless Birds : जगातील ५ न उडणारे पक्षी, तुम्ही कोणता पाहिलात?

पक्ष्यांमधील हस्तमैथुनाच्या बाबतीत शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, हस्तमैथुन हे पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये किंवा ज्यांना त्यांच्या पालकांनी वाढवले ​​नाही अशा पक्ष्यांमध्ये अधिक सामान्य असू शकते. परंतु संशोधनानंतर असे आढळून आले की, हा विश्वास पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचबरोबर, पोपटांसारख्या पाळीव पक्ष्यांमधील हस्तमैथुन हे बंदिवास, एकटेपणा किंवा तणावाचा परिणाम आहे. हा विश्वासही चुकीचा सिद्ध झाला. डॉ. क्लोई हेस यांच्या मते, हस्तमैथुन हा पक्ष्यांच्या लैंगिक वर्तनाचा एक पूर्णपणे नैसर्गिक आणि निरोगी भाग आहे. याचा संबंध कोणत्याही मानसिक तणावाशी किंवा असामान्य स्थितीशी जोडला जाऊ नये असे त्यांनी सांगितले.

Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड
State Birds: तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? वाचा रंजक माहिती

हे वर्तन प्रौढ पक्ष्यांइतकेच लहान पक्ष्यांमध्येही जवळजवळ तितक्याच प्रमाणात आढळून आले. यावरून हे स्पष्ट होते की, हे केवळ लैंगिक परिपक्वतेशी संबंधित वर्तन नाही. संशोधकांच्या मते, लहान पक्षी गोंधळ किंवा तणावामुळे हे वर्तन करत नाहीत. तर तो त्यांच्या नैसर्गिक जैविक क्रियांचाच एक भाग आहे. सामान्यतः असे मानले जाते की, वाढत्या तणावामुळे हस्तमैथुन वाढते आणि म्हणूनच ते पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्ष्यांमध्ये अधिक सामान्य असावे. अभ्यासाच्या निकालांनी याच्या उलट गोष्ट उघड केली. संशोधनात असे आढळून आले की, हे वर्तन पिंजऱ्यातील पक्ष्यांपेक्षा जंगली पक्ष्यांमध्ये अधिक सामान्य होते. पोपट, टर्की आणि कोंबड्यांसह अनेक प्रजातींमध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ही क्रिया अधिक सामान्य असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.

Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड
Birds Predict Monsoon: चातकचं नव्हे आपल्या आजूबाजूला असणारे हे पक्षी देतात पावसाची चाहूल, कसं जाणून घ्याल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com