State Birds: तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? वाचा रंजक माहिती

Dhanshri Shintre

बिहारचा राज्यपक्षी

बिहारचा राज्यपक्षी मोर आहे, जो राष्ट्रीय पक्षीसुद्धा आहे. पावसात नाचणारा मोर सौंदर्याचं अद्वितीय रूप मानलं जातं.

आंध्र प्रदेशचा राज्यपक्षी

निळकंठ हा आंध्र प्रदेशचा राज्यपक्षी आहे, शिवाचे प्रतीक मानला जातो आणि दसऱ्याला दिसणं शुभ समजलं जातं.

केरळचा राज्यपक्षी

केरळचा राज्यपक्षी मोठा धनेश असून त्याची मोठी चोच, काळा-पिवळा रंग आणि जंगलातील उपस्थिती विशेष आकर्षक आहे.

महाराष्ट्राचा राज्यपक्षी

हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी असून तो सह्याद्रीच्या जंगलात आढळतो आणि शांती व सौंदर्याचे प्रतीक मानला जातो.

छत्तीसगडचा राज्यपक्षी

छत्तीसगडचा राज्यपक्षी डोंगर मैना आहे. ती माणसासारखे सूर काढते आणि बस्तर भागात अधिक प्रमाणात आढळते.

हिमाचल प्रदेशचा राज्यपक्षी

हिमाचल प्रदेशचा राज्यपक्षी पश्चिमी त्रागोपान असून त्याचे निळसर, लालसर रंग व ठिपक्यांनी सजलेले शरीर दुर्मिळ दर्शनाचे आकर्षण आहे.

गुजरातचा राज्यपक्षी

गुजरातचा राज्यपक्षी मोठा फ्लेमिंगो असून त्याचा गुलाबी रंग, लांब मान व उंच पाय त्याला देखणा बनवतात.

मध्य प्रदेशचा राज्यपक्षी

मध्य प्रदेशचा राज्यपक्षी स्वर्गीय नर्तक अत्यंत देखणा आहे. त्याचे उडणे इतके नाजूक की तो स्वर्गातून आलेला भासतो.

NEXT: सिंह की बिबट्या! कोणाच्या तोंडात जास्त दात असतात? उत्तर ऐकून बसेल धक्का

येथे क्लिक करा