Shruti Vilas Kadam
पावशा पक्षी “पेरते व्हा… पेरते व्हा” असा आवाज काढतो, तेव्हा शेतकरी पेरणीच्या तयारीला सुरुवात करतात. त्यामुळे या पक्ष्याला पावसाचा दूत मानलं जातं.
रंगीबेरंगी नवरंग पक्षी जंगलात दिसू लागला आणि त्याचा आवाज ऐकू येऊ लागला की वातावरणात बदल होत असल्याचे संकेत मिळतात.
तिबोटी खंडवा, निळ्या कानाचा खंड्या आणि छोटा खंड्या हे पक्षी पावसाआधी पाणथळ जागांजवळ अधिक दिसतात. शेतकरी याला पावसाची चाहूल मानतात.
मोर नाचू लागला किंवा जोरात आवाज करू लागला, तर वातावरणात ओलावा वाढल्याचे समजते. पाणकोंबडीही पावसाआधी अधिक सक्रिय दिसते.
तित्तीर पक्षी “कोड्यान केको” असा विशिष्ट आवाज काढतो. हा आवाज ऐकू येऊ लागला की पावसाळा जवळ आल्याचा अंदाज बांधला जातो.
कोकीळाचा गोड आवाज, कावळ्यांचे मोठ्या थव्याने ओरडणे आणि चिमण्यांची वाढलेली हालचाल हे देखील हवामान बदलाचे संकेत मानले जातात.
पक्ष्यांच्या हालचाली आणि आवाजावरून पावसाचा अंदाज बांधण्याची परंपरा खूप जुनी आहे. आजही अनेक शेतकरी या नैसर्गिक संकेतांवर विश्वास ठेवतात.