Mangla Gauri Vrat 2024: पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढण्यासाठी मंगळा गौरीनिमित्त करा 'हे' व्रत; आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल

Mangla Gauri Vrat 2024: पती-पत्नीच्या नात्यात दूरावा आला असेल तर तुम्ही देखील हे व्रत करू शकता. मंगळा गौरीचे व्रत महिला आपल्या पतीसाठीच करतात.
Mangla Gauri
Mangla Gauri Vrat 2024Saam TV
Published On

यंदाच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केली जाते. प्रत्येक सोमवारी भाविक महादेवाची पुजा करतात. अनेक मुली महादेवासारखा चांगला पती मिळावा यासाठी पुजा अर्चना करतात. सोमवारी महादेवाच्या पुजेसह महिला मंगळा गौरी व्रत देखील पाळतात.

Mangla Gauri
Gauri Kulkarni 90's Style Look: नादखुळा स्टाईल; गौरीच्या फोटोंनी लावलं वेड

कुटुंबात काही समस्या असतील, पती-पत्नीच्या नात्यात दूरावा आला असेल तर तुम्ही देखील हे व्रत करू शकता. मंगळा गौरीचे व्रत महिला आपल्या पतीसाठीच करतात. त्यामुळे संसारात असलेल्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतात.

या वर्षी मंगळा गौरीची सुरुवात २३ जुलै मंगळवारपासून झाली आहे. हिंदू धर्मातील रुढी आणि परंपरांनुसार श्रावण महिन्यात दरवर्षी येणाऱ्या मंगळवारी पारवती देवीची पुजा केली जाते. अखंड सौभाग्य रहावे अशी मागणी महिला देवाकडे करतात. लग्न न झालेल्या कुमारी मुली सुद्धा हे व्रत पाळतात. त्यामुळे आज याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

मंगळा गौरीला करा हा उपाय

एखाद्या तरुणीला विविहात अडचणी येत असतील. वय होऊनही तिचे लग्न जुळत नसेल तर अशावेळी त्या तरुणीने मंगळवारी व्रत करावे. तसेच एक मातीचे भांडे घ्या. मातीचं भाडं नदीमध्ये पाण्यात सोडून द्यावं. पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने त्यात हे भांडे वाहून गेल्यावर लवकरच आनंदाची बातमी मिळते.

लग्नामध्ये मंगळ ग्रहाची समस्या असेल तर मंगळवारी व्रत करा. त्यानंतर गरीब आणि गरजू व्यक्तींना लाल मसूरची डाळ दान करा. यावेळी लाल रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. तसेच लाल वस्त्र सुद्धा दान करू शकता. त्याने कुंडलीतील मंगळ ग्रह शांत होतो.

विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत फारच लाभदायी मानलं जातं. या दिवशी महिलांनी गरजू व्यक्तींना मध दान करावे. त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि प्रेम वाढते.

मंगळ दोषावर आणखी एक उपाय म्हणजे व्रत करण्यासह पुजेवेळी २१ वेळा 'ॐ गौरीशंकराय नमः' या मंत्राचा उच्चार करा. त्याने मंगळ दोष कमी होतो.

भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पुजा करून ब्राम्हण व्यक्तीस अन्न दान द्यावे. असे केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती दोघांची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहते.

टीप : हा लेख सामान्य माहिती आणि लोकांच्या मान्यतेवर आधारीत आहे. आम्ही या माहितीचा दावा करत नाही.

Mangla Gauri
Mangla Gauri Vrat 2024: वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी मंगळागौर व्रत करताना 'हे' उपाय नक्की करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com