मावळात मंगळा गौरीचा फिल्मी पद्धतीने देखावा

देखावा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
मावळात मंगळा गौरीचा फिल्मी पद्धतीने देखावा
मावळात मंगळा गौरीचा फिल्मी पद्धतीने देखावाSaam Tv
Published On

दिलीप कांबळे

मावळ -  सोशल मीडिया,इंटरनेट,मोबाईल गेम मध्ये सध्याची मंडळी व्यस्त असतात,चार चौघे एकत्र आले तरी त्यांना बोलायला वेळ नसतो,सगळयांच्या नजरा मोबाईल Mobile मध्ये कैद असतात. मात्र यापूर्वीची लोकं गुण्यागोविंदाने एकत्र पारावर गप्पा मारायची,सणासुदीला  महिला झिम्मा फुगडी खेळ सणवारीला खेळायच्या या सर्व गोष्टी कुठं तरी हरपल्या आहे. हाच धागा पकडून तळेगांव Tealgaon येथील अभिजित भेगडे या तरुणाने,घरात मंगळागौरी हा भव्य दिव्य हलता देखावा तयार  केला आहे. सत्तर लहान मोठ्या मूर्त्यांचा योग्य रीतीने वापर करून, फिल्मी स्टाईलने सेट उभा करून सध्याच्या काळात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे ही सजावट पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. संपूर्ण मावळ तालुक्यात याची चर्चा आहे. तळेगावच्या भेगडे आळीत आल्यावर आबाल वृद्ध महिलांचा किलबिलाट सुरू होतो. दरवाज्यातून आत गेल्यावर आपण स्वतःला हरवून बसतो,1960 ते 2000 सालपर्यंत महाराष्ट्राचे सण साजरे व्हायचे सर्व एकत्र बसायचे,गप्पा गोष्टी सुरू असायचा,विचारांची देवाण घेवाण केली जायची.

मावळात मंगळा गौरीचा फिल्मी पद्धतीने देखावा
मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही - संजय राऊतांची पंतप्रधानांवर स्तुतीसुमने

मात्र सिमेंटच्या जंगलाला ग्रामीण भागात वाट मिळत नव्हती परंतु जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि या देखाव्यातून एक सामाजिक संदेश देण्यात आला. पर्यावरणपूरक असा मंगळागौरीचा या सजावटीत जात्यावर दळण, मिरची कांडप, झिम्मा फुगडी,गाणी,चुलीवरचे जेवण,जुन्या काळातील घरे आणि त्यात पितळेचे भांडे,बंब,पोलीस पाटील,भाजीपाला, दुग्धजन्य ,जनावरे,चावडीवरच्या गप्पा,तर मागे सुगरणीचा खोपा, बागडणारे पक्षी,एकाच स्टेजवर संपूर्ण एका गावाची नेत्रदीपक सुंदर निर्मिती केली आहे.

मंगळागौरीचा देखावा तयार करण्यासाठी भेगडे घरातील प्रत्येक सदस्य दिवसरात्र झटत होता. यातून संपुर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणले आहे. त्यामुळे कुठे तरी आपण सण साजरे करायला विसरून तर नाही गेलो ना? हाच भास या दृश्यातून होतो.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com