मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही - संजय राऊतांची पंतप्रधानांवर स्तुतीसुमने

नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे, मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येथे केले
Sanjay Raut - Narendra Modie
Sanjay Raut - Narendra Modie- Saam Tv

मुंबई : ''नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे, मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान Prime Minister आहेत, म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, मी देखील त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो,'' असे म्हणत शिवसेनेचे Shivsena खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Shivsena Leader Sanjay Raut Praises Narendra Modi

पंतप्रधानांना शुभेच्छा देताना राऊत पुढे म्हणाले, "मोदी वाढदिवसनरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत, अनेक वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही पाहिला आहे, मोदी यांच्या काळात देशाला राजकीय स्थैर्य लाभले आहे, भाजपा नेहमीच आघाड्या बनवून सत्तेत होते, मात्र मोदींच्या काळात एक हाती सत्ता बनवू शकले, ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य करायला हवं,"

Sanjay Raut - Narendra Modie
चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल? काय म्हणाले संजय राऊत

दुसरीकडे राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोमणा मारला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपणाला माजी मंत्री म्हणू नका, असे वक्तव्य केलं होतं. त्याचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतला. माझ्या असे कानावर आले आहे की नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांना विचारणा केली आहे, म्हणून कदाचित ते म्हणाले असतील, जर नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा...असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना चिमटा काढला. Shivsena Leader Sanjay Raut Praises Narendra Modi

"चंद्रकांत दादा Chandrakant Patil हे राजकीय विरोधक जरी असले तर ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत, आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत, काल ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका, ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो, पण मी त्यांना निरोप पाठवला आहे की पुढील पंचवीस वर्ष तुम्हाला माजी म्हणूनच राहावं लागेल, उद्धवजींच्या Uddhav Thackeray नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवु, त्यामुळे पंचवीस वर्ष मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या, अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही,"असेही राऊत म्हणाले.

अभिनेता सोनू सूद Sonu Sud यांच्या प्राप्तीकर खात्याकडून होणाऱ्या चौकशीबाबत राऊत म्हणाले, "सोनू सूद विषयी पक्षाची भूमिका असण्याचे कारण नाही, मात्र गेल्या वेळी याच सोनू सुदने अनेक प्रवासी मजुरांसाठी गाड्या, विमान बुक केली होती, त्यावेळी भाजपने आम्हाला सांगितलेलं, की एकटा माणूस काय करू शकतो, मात्र सरकार म्हणून आम्ही काही करत नाही, मात्र काल मला समजलं, केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक धोरणाविषयीचे काम सोनूने घेतल्यावर या सरकारचा सोनू सूद दुश्मन झाला, ज्याने कर चुकला आहे त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मात्र त्यामागे ही पार्श्वभूमी असल्याचे मला आता लक्षात आले,''

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com