

घरातील स्वयंपाकघर म्हणजेच किचन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा असणं महत्त्वाचं मानलं जातं. याचा चांगला परिणाम संपूर्ण घरावर होतो, अशी मान्यता आहे. पण किचनशी संबंधित काही चुका घरात नकारात्मक ऊर्जा, वाद आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
यामध्ये किचनमधील रंगांनाही विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक जण स्वयंपाकघरात काळ्या रंगाची भांडी, कपडे, भिंती किंवा इतर वस्तू वापरतात. पण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये काळ्या रंगाचा जास्त वापर करणं शुभ मानलं जात नाही. असं का सांगितलं जातं आणि किचनसाठी कोणते रंग योग्य आहेत, ते जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, किचन हे अग्नी तत्त्वाशी संबंधित ठिकाण मानले जाते. तर काळा रंग सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश शोषून घेतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा रंग अग्नी तत्त्वासाठी योग्य मानला जात नाही. यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांना बेचैनी आणि मानसिक तणाव जाणवू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे किचनमध्ये काळ्या रंगाचा जास्त वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.
किचनच्या भिंतींना काळा रंग देणं टाळावं. त्याचप्रमाणे काळ्या रंगाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं, नळ, सिंक, सामान ठेवण्याची कपाटं, भांडी, डिनर सेट आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा वापरही शक्य तितका कमी करावा.
वास्तुशास्त्रानुसार, काळ्या रंगासोबतच गडद निळा, जांभळा, राखाडी, लाल, सोनेरी आणि गडद तपकिरी रंगांचाही किचनमध्ये वापर करू नये, असं सांगितलं जातं. हे रंग अग्नी तत्त्वाच्या विरुद्ध मानला जातो. त्यामुळे किचनमधील ऊर्जेचं संतुलन बिघडू शकतं, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.
किचनमध्ये नेहमी हलक्या रंगांचा वापर करावा, असा वास्तुशास्त्राचा सल्ला आहे. यामध्ये पांढरा, क्रीम, हलका पिवळा, हलका हिरवा, फिकट राखाडी आणि हलका निळा या रंगांचा समावेश होतो. हे रंग डोळ्यांना त्रास देत नाहीत. त्याचप्रमाणे या रंगांमुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत नाही, असं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे किचनच्या भिंती, कपाटं आणि इतर वस्तूंसाठी हलक्या रंगांची निवड करावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.