Bullet Village In Maharashtra: दुष्काळी गाव ते बुलेटचं गाव! फक्त एक बदल अन् गावाची ओळखच बदलली

Sangli Bullet Bikers Village Bedag: ही ओळख कशी निर्माण झाली ? अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला बुलेटची क्रेझ आहे.
Bullet Village
Bullet VillageSaam tv
Published On

Bullet Bikers Village: अरे आर्ची आली रे आली... सैराट चित्रपट पाहिला आणि आर्चीचे बुलेट क्रेझ सगळ्यांच मुलींच्या रक्तात भिनायला लागले. बुलेटची क्रेझ प्रत्येकात आहे.

पूर्वी पोलीसांची गाडी ही बुलेट (Bullet) म्हणून ओळखले जायची. सध्या बाईक घेण्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त मागणी असते ती बुलेटला. हल्ली तरुणांपेक्षा तरुणींना बुलेट चालवण्यात अधिक रस आहे. पण ही क्रेझ आता चांगलीच वाढली आहे.

Bullet Village
Chulivarche Jevan : चुलीवर शिजवलेले अन्न चवदार का लागते?

ही घटना आहे सांगली (Sangli) जिल्ह्यातील एका गावाची. याला बुलेटचं गाव अशी ओळख आहे. ही ओळख कशी निर्माण झाली ? अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला बुलेटची क्रेझ आहे. ही ओळख का निर्माण झाली ? या गावातील प्रत्येकाला बुलेटची क्रेझ का आहे? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

1. बुलटेचं गाव

सांगली जिल्ह्यातील बेडग हे साधारण २७ हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. याला बुलेटचं गाव म्हणून ओळखलं जातं. पूर्वी या ठिकाणी वाहने कमी पाहायला मिळायची. त्यात मोटारसायकल ही फार कमी लोकांकडेच. वीस वर्षांपूर्वीपर्यंत दुष्काळ म्हणून ओळख असणाऱ्या मिरज पूर्व भागात म्हैसाळ सिंचन योजनेमार्फत संपूर्ण गाव हिरवेगार झाले. या ठिकाणी द्राक्षे, ऊस व बागायती शेती फुलवल्या. दारात उभ्या असणाऱ्या बैलगाडीने चारचाकी वाहनांची जागा घेतली.

Bullet Village
Perfect Age For Marriage: लग्नासाठी योग्य वय कोणतं?

2. बुलेटला पसंती

खानदानी रुबाबात बुलेट आता नव्या पिढीला अधिक पसंत येऊ लागली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी पानमळ्यांचे बेडग म्हणून ओळख असणाऱ्या बेडग गावाला आज बुलेटवाले बेडग म्हणून ओळखले जाते.

3. कुठे आहे बेडग गाव ?

सांगली जिल्ह्यातील मिरजेपासून दहा किलोमीटर असणारे बेडग. येथील गावकरी प्रामुख्याने ऊस व द्राक्षे याची शेती करतात. त्याचबरोबर कुक्कूटपालन हा त्यांचा व्यवसाय आहे. येथे बुलेटचे क्रेझ इतके आहे की, तरुणांसोबत ज्येष्ठ मंडळी देखील ती खरेदी करतात. एकमेकांच्या दारातील बुलेट पाहून आपणही नवीन मॉडेलच्या बुलेट खरेदी कराव्या असे प्रत्येकाला वाटू लागले. त्यामुळे घरोघरी (Home) बुलेट दिसू लागल्या. तसेच येथील प्रत्येक पिढीने या बुलेटची क्रेझ जपून ठेवली आहे व वारसा हक्काप्रमाणे गावचा हक्क म्हणून रुबाबदार बुलेट प्रत्येकाच्या दारात उभी असते.

Bullet Village
Rutuja Bagwe : तिच स्टाइल, तशीच अदा, रुतुजाला बघताच चाहते म्हणाले सेम टू सेम दीपिका...

4. बुलेटची क्रेझ

येथील तरुणींनाही बुलेटच क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. त्या कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना बुलेटवर स्वार होऊन निघतात. तसेच प्रत्येकाच्या दारात बुलेटच्या वेगवेगळ्या मॉडेल्स पाहून या गावाला बुलेट गाव म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com