Ankush Dhavre
विवाह होणं हा आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे.
विवाह झाल्यानंतर खूप जबाबदाऱ्या येत असतात. त्यामुळे हा निर्णय घेताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं.
तसं पाहायला गेलं तर प्रत्येक देशात लग्न करण्यासाठी वयाची अट आहे. भारतात मुलीचं वय १८ तर मुलाचं वय २१ असणं गरजेचं आहे.
हे वय शारीरिक परिपक्वतेसाठी योग्य आहे.
मात्र काही तज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार,आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी वय कमीत कमी २५ असणं गजरेच आहे.
तसेच या अहवालानुसार, २५ पेक्षा कमी आणि ३० पेक्षा अधिक वय झाल्यानंतर लग्न करणाऱ्यांचे घटस्फोट होण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे विवाह करण्यासाठी योग्य वय २५ ते ३० च्या मध्येच आहे. याच वयात आपण मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असतो.
त्यामुळे लग्न करण्याचा विचार करत असाल तर वय वर्ष २५ पूर्ण झाल्यानंतरच करा..
NEXT: Monalisa: मोनालिसाला आली लहर, बोल्ड अवतारात केला कहर..