

फेब्रुवारी हा महिना लोक प्रेमाचा महिना म्हणून प्रेयसीसोबत साजरा करतात. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाईन वीक सुरु होतो. त्यातला पहिला डे हा ७ फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला जातो. त्याला Rose Day म्हणतात. हा या प्रेमाच्या आठवड्याचा पहिला दिवस आहे. या दिवसापासून प्रेम, आपुलकी आणि नात्यांचं व्यक्त होणं सुरू होतं. तरुणाईसोबतच विवाहित जोडपी आणि मित्रपरिवारही हा दिवस उत्साहात साजरा करतात.
Rose Day चा नेमका उगम स्पष्ट नसला तरी गुलाबाचे प्रेमाशी असलेले नातं प्राचीन आहे. रोमन संस्कृतीत गुलाब प्रेमाची देवी व्हिनस शी जोडला जातो. ग्रीक संस्कृतीमध्येही गुलाबाचा संबंध प्रेमाची देवी अॅफ्रोडाईट शी आहे. व्हिक्टोरियन काळात गुलाबांच्या रंगांद्वारे भावना व्यक्त करण्याची परंपरा सुरू झाली.
Rose Day हा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग मानला जातो. गुलाब देऊन प्रेम, मैत्री, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.
हा दिवस संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकसाठी सकारात्मक आणि रोमँटिक वातावरण निर्माण करतो. नात्यांमध्ये संवाद आणि भावना खुल्या मनाने मांडण्याची संधी मिळते. हा दिवस तरुणाई मोठ्या उत्साहात साजरा करते. काही कॉलेजमध्ये हे सगळे डे साजरा करण्याची परवानगी दिली जाते.
लाल गुलाब
खोल प्रेम, निष्ठा आणि रोमँटिक भावना दर्शवतो.
गुलाबी गुलाब
आपुलकी, कृतज्ञता आणि सौम्य प्रेमाचे प्रतीक आहे.
पांढरे गुलाब
शुद्धता, शांतता आणि नवीन सुरुवातीचा संकेत देतो.
पिवळे गुलाब
मैत्री, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.
नारंगी गुलाब
आकर्षण आणि उत्साह दर्शवतो.
जांभळा गुलाब
पहिल्या नजरेतील प्रेम सूचित करतो.
निळा गुलाब
रहस्यमय भावना आणि अद्वितीय नात्याचे प्रतीक आहे.
मिश्र रंगांचा गुलदस्ता
विविध भावना एकत्र व्यक्त करतो.
Rose Day 2026 हा फक्त गुलाब देण्याचा दिवस नसून, तो नात्यांना नवे अर्थ देण्याचा खास क्षण आहे. एक गुलाबही अनेक भावना व्यक्त करू शकतो. म्हणूनच प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. त्यामुळे नात्यामधले राग रुसवे विसरुन एक गुलाब आपल्या प्रिय व्यक्तीला जरुर द्यावं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.