Rose Day Special: रोज डेच्या दिवशी गुलाब मिळाला तर रंगावरून भावना ओळखा, प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा

गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ काय आहे ते जाणून घ्या...
Rose
Rose Saam Tv
Published On

आजच्या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना लाल गुलाब (Rose) देतात पण गुलाबाची फुले अनेक रंगात येतात. या गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा असतो. कोणालाही कोणत्याही रंगाचा गुलाब देता येत नाही. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ काय आहे ते जाणून घ्या.

लाल गुलाब - हा गुलाब बाजारात सहज मिळतो आणि अनेकदा आपण कुणाला तरी देण्यासाठी या रंगाचे गुलाब विकत घेतो. लाल रंगाचे गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला लाल गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

पिवळा गुलाब - पिवळा रंग म्हणजे त्याला तुमच्याशी मैत्री करायची आहे. पिवळे गुलाब मैत्री आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत.

हे देखील पहा -

गुलाबी गुलाब - गुलाबी रंगाचा गुलाब देखील तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. याशिवाय याचा अर्थ मैत्री असाही होतो. जर एखाद्या मित्राने तुम्हाला गुलाबी गुलाब दिले तर याचा अर्थ असा होतो की त्याच्यासाठी तुमची मैत्री आवश्यक आहे.

पांढरा गुलाब - पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, पांढरा गुलाब देखील तक्रारी मिटवून पुढे जाण्याचे प्रतीक आहे. जर कोणी तुमच्यावर रागावला असेल आणि तुम्हाला त्याची माफी मागायची असेल तर तुम्ही पांढरा गुलाब देऊ शकता.

नारिंगी गुलाब - केशरी गुलाब हे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला तुमचे प्रेम कोणावर व्यक्त करायचे असेल तर तुम्ही या रंगाचे गुलाब देऊन तुमच्या भावना सांगू शकता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com