Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिशास्त्रात जीवन, यश, संगत आणि स्वभाव यावर सखोल मार्गदर्शन केले आहे.
चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती समजून घेण्याची क्षमता ठेवत नाही, त्याला दिलेला सल्ला वाया जातो.
जो तुमच्या सल्ल्यावर विचार करत नाही, त्याला सल्ला देण्याचा काहीच उपयोग नाही.
चरित्रहीन व्यक्तीची संगत मानसिक त्रास आणि बदनामीचं कारण ठरू शकते.
कायम नकारात्मक विचार करणारी माणसे इतरांनाही नैराश्यात ओढतात. याने तुमचा मानसिक ताण वाढू शकतो.
चाणक्यांच्या मते, चुकीच्या स्वभावाच्या व्यक्तीला मदत केल्याने शेवटी नुकसानच होते.
चुकीची संगत ध्येयापासून भरकटवते आणि आत्मविश्वास कमी करते.
प्रगतीसाठी सकारात्मक विचारसरणी आणि मोठा दृष्टिकोन आवश्यक आहे.
ऊर्जा आणि प्रेरणा देणारी माणसे यश लवकर मिळवून देतात. चाणक्य नितीनुसार, माणसाची संगतच त्याचे भविष्य घडवत असते.