Valentine Day 2026: प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात कधी होणार? जाणून घ्या प्रत्येक दिवस का आहे खास?

Valentine Week 2026: व्हॅलेंटाईन वीक 2026 मध्ये रोज डेपासून व्हॅलेंटाईन डेपर्यंत प्रेम व्यक्त करण्यासाठी खास आठ दिवस असतात. प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे.
Valentine Week Calendar
Valentine Day 2026saam tv
Published On

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाची चाहूल आपोआप लागते. कॅलेंडर पाहून नाही, तर मनातल्या भावना पाहूनच हा महिना खास वाटतो. हवेत गुलाबांचा सुगंध, मोबाईलवर येणारे गुलाबी हार्टचे इमोजी आणि नात्यांमध्ये येणारी हलकीशी गोडी...याच वातावरणात Valentine वीक 2026 येत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी छोट्या-छोट्या क्षणांचा हा संपूर्ण आठवडा असतो.

Valentine वीकची सुरुवात 7 फेब्रुवारी रोज डे पासून होते. या दिवशी गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. कोणी जोडीदारासाठी, तर कोणी मित्र-मैत्रिणींसाठी किंवा क्रशसाठी गुलाब देऊन त्यांचे आयुष्यातील महत्त्व सांगतो. त्यानंतर 8 फेब्रुवारीला प्रपोज डे येतो. हा दिवस मनातली गोष्ट सांगण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी खास मानला जातो.

Valentine Week Calendar
WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

9 फेब्रुवारी चॉकलेट डे नात्यांमध्ये गोडवा आणतो. छोटंसं चॉकलेटही त्या नात्यातली कडवटपणा दूर करू शकतं. 10 फेब्रुवारी टेडी डे रोजच्या धावपळीत थोडीशी माया आणि निरागसतेची आठवण करून देतो. मऊसूत टेडी प्रेमाचं गोंडस प्रतीक मानलं जातं. 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे. या दिवशी एकमेकांना दिलेली आश्वासनं, विश्वास आणि साथ यांना महत्त्व असतं.

12 फेब्रुवारी हग डे भावनांना शब्दांशिवाय व्यक्त करण्याचा दिवस असतो. एका मिठीतून खूप काही सांगितलं जातं. 13 फेब्रुवारी किस डे नात्यातील जवळीक आणि विश्वास अधिक घट्ट करतो. आणि शेवटी येतो 14 फेब्रुवारी वॅलेंटाइन डे. हा दिवस प्रेमाचा एक मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. नात्याचा स्वीकार, एकत्र असण्याचा आनंद आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हा क्षण असतो.

Valentine Week Calendar
Nankhatai Recipe: तोंडात टाकताच विरघळेल नानकटाई, वाचा सोपी अन् तव्यावर बनणारी खुसखुशीत रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com