WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Whatsapp Strict Account Settings: व्हॉट्सॲपने Strict Account Settings नावाचे नवे सुरक्षा फिचर सादर केले असून, सायबर स्कॅम, हॅकिंग आणि अनोळखी मेसेजपासून युजर्सना अधिक सुरक्षित ठेवणार आहे.
WhatsApp Update
WhatsApp Strict Account Settingsgoogle
Published On

Whatsapp लोक आजकाल सगळ्याच महत्वाच्या कामांसाठी वापरतात. मुळात हे एक फ्री अॅप आहे जे फक्त इंटरनेटच्या आधारे आपण वापरु शकतो. त्यामध्ये आपले अनेक डॉक्युमेंट्स, पीडीएफ, फोटो, महत्वाचे मेसेज, आपले पर्सनल चॅट्स, बॅंकेची कागदपत्रे असतात. जी आत्तापर्यंत सुरक्षितपणे अनेकजण वापरत आहेत. पण कधी कोणत्यावेळी तुमचं Whatsapp हॅक झालं तर...? याचाच विचार करुन Whatsapp कंपनीच्या प्रमुखांनी म्हणजेच विल कॅथकार्ट यांनी तातडीने एक सुरक्षित फिचर आणलं आहे. ज्याचा वापर सगळ्यांनीच करणे महत्वाचे आहे.

Whatsapp ने सायबर स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी नवे फिचर आणले आहे. त्याचे नाव Strict Account Settings आहे. हे लॉकडाऊनसारखं सुरक्षा फीचर आहे असं तुम्ही म्हणू शकता. याचा उद्देश युजर्सना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवणं हा आहे. ऑनलाइन कॉल हे प्रत्यक्ष भेटीतल्या संभाषणाइतकंच खासगी असायला हवं.

WhatsApp Update
Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

त्यामुळेच सुरुवातीपासूनच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देण्यात आलं आहे. पण काही युजर्स जसं की, पत्रकार, नेते मंडळी व्यक्ती किंवा संवेदनशील माहिती हाताळणारे लोक, यांना जास्त सुरक्षेची गरज असते. अशा लोकांसाठी Strict Account Settings फीचर खूप उपयोगी ठरणार आहे.

जेव्हा तुम्ही हे फीचर ऑन कराल, तेव्हा व्हॉट्सॲपमधले काही सेटिंग्स सुरक्षितपणे लॉक होतील. उदाहरणार्थ, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून येणारे फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स आपोआप ब्लॉक होतील. त्यामुळे संशयास्पद मेसेज, स्पायवेअर किंवा हॅकिंगचा धोका कमी होईल.

व्हॉट्सॲपने सांगितलं आहे की, यूजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनी मागील काही दिवसात अनेक बदल करत आहे. यामध्ये ‘Rust’ नावाच्या नवीन प्रोग्रामिंग भाषेचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस जास्त सुरक्षित राहतात. Strict Account Settings फीचर सध्या टप्प्याटप्प्याने युजर्सुपर्यंत पोहोचत आहे. अपडेट आल्यानंतर Settings > Privacy > Advanced या पर्यायातून हे फीचर सुरू करता येईल.

WhatsApp Update
Samsung 5G Phone: सॅमसंगचा मोठा धमाका! Galaxy A07 5Gमध्ये दमदार कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com