Sakshi Sunil Jadhav
घरामध्ये रोज नाश्त्याला मुलं कांदे-पोहे, उपमा, बिस्कीटं खाऊन वैतागतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी करु शकता.
१ कप मैदा, अर्धा कप साखर आणि तूप, १ चमचा वेलची पूड, १ चमचा बेकींग सोडा, १ चमचा दूध आणि २ काजू आणि पिस्ता पूड
नानकटाई बनवण्यासाठी सगळ्यात आधी साखर पावडर आणि तूप एका भांड्यात मिक्स करुन घ्या. त्याची व्यवस्थित क्रिम तयार करा.
आता पेस्टमध्ये वेलचीपूड आणि बेकींग सोडा मिक्स करुन घ्या. यामध्ये आता पाण्याचा किंवा दुधाचा वापर करु नका.
आता मिश्रणात मैदा बारिक चाळणीने चाळून घ्या. आणि त्याचं कणीक मळा. यासाठी तुम्ही दूधाचा वापर करु शकता.
आता कणकेचे लहान गोळे करुन बिस्कीटांचा आकार द्या. तुम्ही गोल करुनही ठेवू शकता.
आता तुमच्या बिस्कीटांवर ड्रायफ्रुट्स चिकटवा. मग ते ५ ते १० मिनिटे रुम टेम्पप्रेचरवर तसेच राहू द्यात.
पुढे मंद आचेवर जाड तवा गरम करा. मग त्यावर एक स्टॅंड ठेवून ढोकळ्यांच्या भांड्यात नानकटाई ठेवून बेक करा.
२० मिनिटांनी ते चमच्याने तपासा. ओली नानकटाई काढू नका. पुर्णपणे थंड झालंकी मुलांसोबत नाश्त्यासाठी सर्व्ह करा. ही तुम्ही झाकण बंद डब्यात साठवून ठेवू शकता.