Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, जास्त बोलणारी व्यक्ती ताकदवान असते हा समज चुकीचा आहे. खरा धोका त्या व्यक्तीकडून असतो.
जी व्यक्ती कमी बोलते ती आजूबाजूच्या लोकांच्या सवयी, वागणूक आणि कमकुवत बाजू लक्षात ठेवते. हे निरीक्षण तिला इतरांपेक्षा पुढे नेते.
शांत व्यक्ती तिचे प्लान्स कधीच सर्वांसमोर मांडत नाही. ती आपले विचार मनात ठेवते आणि योग्य वेळी कृती करते.
शांत व्यक्तीला लोक कमी लेखतात. कमजोर समजतात. पण हीच चूक पुढे जाऊन त्यांच्यासाठी घातक ठरते.
जास्त बोलणारी व्यक्ती रागात किंवा भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेते. शांत व्यक्ती विचार करूनच पाऊल उचलते.
शांत व्यक्ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्यावरच बोलते किंवा कृती करते, त्यामुळे तिचा प्रभाव खोलवर होतो.
चाणक्यांच्या मते, बुद्धिमान व्यक्ती शब्दांपेक्षा कृतीने उत्तर देते. शांत व्यक्ती भांडत नाही, तर परिस्थिती आपल्या बाजूने वळवते.
शांत व्यक्ती सर्व काही माहित असूनही शांत राहते. हीच शांतता तिला रणनीतिक आघाडी देते.
शांत व्यक्ती किती सहन करू शकते हे कुणालाच माहीत नसतं. पण मर्यादा ओलांडली की तिचा प्रतिसाद सर्वांना आश्चर्यचकित करतो.