• वाढत्या प्रदूषणामुळे ॲलर्जीक सर्दीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे
• वारंवार सर्दी होण्यामागे ॲलर्जी हे मूळ कारण असते
• फक्त लक्षणांवर उपचार केल्याने आजार पुन्हा पुन्हा बळावतो
• होमिओपॅथी उपचार प्रतिकारशक्ती वाढवून मुळावर काम करतात
• नियमित उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दीर्घकालीन आराम शक्य
गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या प्रमुख शहरांमध्ये प्रदुषणामुळे श्वसनसंस्थेचे विकार वाढताना दिसत आहे. त्यामध्ये ॲलर्जीक सर्दीचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. वारंवार शिंका येणे, मध्यरात्री नाक गच्च् होणे, कानात, नाकात आणि घशात खाज येणे अशी सुरूवात होऊन मग नाकातून पाण्यासारखी सर्दी, नाकातील पटलाला सूज येणे, डोळ्याच्या पापण्या सुजणे, डोळे लालसर होणे अशा स्वरुपात ॲलर्जीक सर्दीचा त्रास होत असतो. त्यानंतर तो वाढत जाऊन नाकाचे हाड देखील वाढते. अनेक नागरिक हे कित्येक वर्ष हे या त्रासामुळे हैराण होत असतात. तर हाड वाढलेले असल्यास शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टर सल्ला दिला जातो.
मात्र सर्व काही उपाय करून देखील रुग्णांना आराम मिळत नसल्याने कंटाळून कुठलाही उपचार न घेण्याचा ठरवत आयुष्यभर हा त्रास सहन करत असतात. परंतु यावर मधुबन होमिओपॅथी होलिस्टिक हेल्थ केअर क्लिनिकचे डॉक्टर मुकुंद दुसाने यांनी यावर सविस्तर सांगत या मागची प्रमुख कारणे आणि अचूक उपाय काय आहे त्याची माहिती दिली आहे.
आता ही ॲलर्जी म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. डॉक्टर मुकुंद दुसाने यांनी सांगितले, आपल्या सभोवतालच्या बदलांशी आपले शरीर नेहमीच जूळवून घेत असते. हे शक्य होते ते आपल्या रोगप्रतिकार क्षमतेच्या मदतीने. सभोवतालच्या बदलांशी जुळवून घेणे जेव्हा शरीराला कठीण जाते. तेव्हा मात्र आजारांची निर्मिती होत असते. जेव्हा आपले शरीर एखाद्या गोष्टीला जास्त संवेदनशील होते. तेव्हा मात्र त्या गोष्टींचा त्रास सुरू होतो. ॲलर्जी म्हणजे विशिष्ट अशा एका किंवा अधिक प्रकारच्या गोष्टीबद्दल निर्माण झालेली प्रमाणापेक्षा जास्त संवेदनशीलता होय. यात रुग्ण जेव्हा जेव्हा अशा गोष्टींच्या संपर्कात येतो. तेव्हा ॲलर्जीक प्रतिसादामुळे त्रास होतो. अशा गोष्टींना अथवा घटकांना ॲलर्जेन असे म्हणतात. परागकण, धुळ, धूर इत्यादी ही या ॲलर्जेनची काही उदाहरणे.
ॲलर्जी सर्दी होण्याची प्रमुख कारणे
पाण्यामध्ये बदल, हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, थंडीचे दिवस, वारा लागणे, धुर, धुळ, थंड पदार्थ अथवा थंड पेय, परागकण, शेतीत वापरले जाणारे केमिकल्स इत्यादी कारणांना आपली प्रकृती जास्तीची संवेदनशीलता दाखवते. म्हणजेच ॲलर्जीक स्थिती निर्माण करते. त्यामुळे या कारणांना सामोरे गेले की, लगेचच सर्दी होते. नाक वाहणे, शिंका येणे सुरू होते. जो पर्यंत ही ॲलर्जी जात नाही तो पर्यंत सर्दी पुन्हा पुन्हा होत राहते. अर्थातच सर्दी पुर्णपणे घालविण्यासाठी ॲलर्जी दूर करणे हाच एकमेव पर्याय आहे.
यावरून हे लक्षात येते की प्रकृतीत निर्माण झालेल्या दोषांमुळे ॲलर्जीक सर्दीचा त्रास होत असतो. यात उपचार म्हणून रुग्ण सर्दी झाली की सर्दीची गोळी घेणे अथवा नाकात औषध स्प्रे करणे हा नित्यक्रम सुरू ठेवतात. ती गोळी फक्त सर्दी कमी करते. पण ॲलर्जी मात्र तशीच राहते. याशिवाय औषधांचे दुष्परिणाम होतात ते वेगळेच. नंतर पुन्हा रुग्ण ॲलर्जी असलेल्या गोष्टीच्या संपर्कात येतो आणि पुन्हा सर्दी सुरु होते. असेच अनेक वर्षे चालत राहते. तसेच याचेच रूपांतर अनेकदा ॲलर्जीक दमामध्ये होतांना ही दिसते.
बरेचदा काही रुग्णांना याचे काही सर्जिकल उपचार सुचवले आणि केलेही जातात. परंतु सर्दी मात्र तरीही सुरूच राहते. त्यामुळे रुग्णांनी केवळ सर्दी जाण्यासाठी उपचार घेऊन उपयोग नाही. यात गरज आहे ती प्रकृतीतल्या दोषांना दुर करत ॲलर्जीक प्रतिसाद कमी करणाऱ्या औषधांची.
लक्षणांवर नव्हे, तर आजाराच्या मुळावर होमिओपॅथी उपचार
होमिओपॅथीक उपचारात अशी औषधे उपलब्ध आहेत. ज्यामुळे ॲलर्जीला पुर्णपणे दुर करता येते. होमिओपॅथीक उपचाराने ॲलर्जीक प्रतिसाद कमी कमी होत जाऊन सर्दीची वारंवारता कमी होत जाते. ही औषधे केवळ सर्दी कमी व्हावी म्हणून नाही तर सर्दीमागचे कारण असणारी ॲलर्जी पुर्णपणे नष्ट करावी म्हणून दिली जातात. ॲलर्जी गेली की सर्दीचा त्रास कायमचा थांबतो. या व्याधीचे मुळ जुनाट आणि खोलवर असल्याकारणाने उपचारात सातत्य ठेवणे गरजेचे ठरते.
उपचारादरम्यान नियमित फेरतपासणी करून प्रतिकार क्षमतेला वाढवणारी औषधे टप्प्याटप्प्याने दिली जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे फेरतपासणीस येणे संपुर्ण बरे होण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते. बऱ्याच वर्षांपासून सर्दीवर गोळी घेऊन जो फायदा होत नाही तो फक्त काही काळ नियमितपणे होमिओपॅथीक औषधे घेऊन होत असतो. ॲलर्जीक सर्दी, ॲलर्जीक दमा ॲलर्जीक त्वचाविकार, नेत्रविकार , अन्नपदार्थांशी संबंधीत ॲलर्जी अशी कुठलीही ॲलर्जी असो, होमिओपॅथीक उपचाराने ती पुर्णपणे बरी करता येते.
ते पुढे म्हणाले की, नेहमी उपचार निवडतांना हे प्रकर्षाने ध्यानात ठेवावे की जे उपचार आपली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचे संवर्धन करत रोगनिवारण करतात तेच उपचार आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट असतात, असे आवाहन डॉक्टर मकुंद दुसाने यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.