Homeopathic Doctor : होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती; बीएचएमएस डॉक्टर आक्रमक

Dharashiv News : राज्य सरकारकडून निर्णय घेत सदर उपचार पद्धतीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला होमिओपॅथी डॉक्टरांकडून विरोध करण्यात येत असून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
Homeopathic Doctor
Homeopathic DoctorSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
:  होमिओपॅथी अर्थात बीएचएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथीचे उपचार करता येणार नाहीत. राज्य सरकारकडून याबाबत निर्णय देत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द झाली असून होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे लिहिण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. या स्थगिती विरोधात  बीएचएमएस डॉक्टर आक्रमक झाले असून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 

चुकीचे निदान झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता वर्तवत आयएमए कडून होमिओपॅथी डॉक्टरांकडून ॲलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर राज्य सरकारकडून निर्णय घेत सदर उपचार पद्धतीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला होमिओपॅथी डॉक्टरांकडून विरोध करण्यात येत असून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 

Homeopathic Doctor
Nanded : हुंड्याचे लाख रुपये न दिल्यामुळे नवविवाहितेची हत्या; नातेवाईकांचा आरोप, चौघांविरोधात गुन्हा

तर उद्यापासून आंदोलन 

बीएचएमएस होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथीचे उपचार करण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. स्थगितीनंतर बीएचएमएस डॉक्टर आक्रमक झाले असून तात्काळ स्थगिती उठवावी; अन्यथा उद्यापासून आझाद मैदानात राज्यभरातील लाखो डॉक्टर आंदोलनाला बसतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला. आंदोलना दरम्यान काही कमी जास्त झाले, तर मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र सरकारची जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.

Homeopathic Doctor
Pandharpur Ashadhi Wari : आषाढीत विठूरायाची श्रीमंती वाढली; भाविकांकडून विठुरायाच्या चरणी १० कोटींचे दान

मग आयएमएस संघटनेला रुग्णालयात डॉक्टर कसे चालतात?

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून आयएमए संघटनेच्या सांगण्यावरूनच होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी उपचार करायला स्थगिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामीण भागात प्राथमिक अवस्थेत करत असलेले उपचार आयएमए संघटनेच्या सांगण्यावरून सरकारने स्थगित केले. मग आयएमएस संघटनेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी डॉक्टर कसे चालतात असा सवाल डॉक्टरांनी केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com