Pandharpur Ashadhi Wari : आषाढीत विठूरायाची श्रीमंती वाढली; भाविकांकडून विठुरायाच्या चरणी १० कोटींचे दान

Pandharpur News : यंदाच्या आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत येत विठुरायाचे दर्शन घेतले. दर्शन घेण्यासोबत अनेक भाविकांनी विठूराच्या चरणी दागिने तसेच रोख रक्कम स्वरूपात दान दिले
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : आषाढी वारीत राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. तर  नुकत्याच संपन्न झालेल्या यंदाच्या आषाढीच्या पंढरीत आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणी तब्बल १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात २ कोटी ३५ लाख ४९ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

पंढरपूरची आषाढी वारी म्हटली म्हणजे वारकरी व भाविकांची मांदियाळी असते. आषाढी निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. त्यानुसार यंदाच्या आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत येत विठुरायाचे दर्शन घेतले. दर्शन घेण्यासोबत अनेक भाविकांनी विठूराच्या चरणी दागिने तसेच रोख रक्कम स्वरूपात दान दिले आहे. २८ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी विठुरायाच्या चरणीवर विविध स्वरुपात दान अर्पण केले आहे. 

Pandharpur News
Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

२ कोटी ५९ लाखांचे दागिने अर्पण 

वारी काळात विठुरायाच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण करण्यात आले आहेत. तर २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगीच्या स्वरुपात मंदिर समितीला मिळाले आहेत. १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपयांची देणगी हुंडी पेटीतून मिळाली आहे. तर ३२ लाख ४५ हजार ६८२ रूपये परिवार देवतांच्या देणगी पेटीतून मिळाली आहेत. २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये किंमतीचे सोने- चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. 

Pandharpur News
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये १ कोटी ३२ लाख किमतीचा गांजा जप्त; टेम्पोतून वाहतूक, पोलिसांची मोठी कारवाई

तसेच ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्रीतून मिळाले आहेत. ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्त निवासाच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे. इतर काही उपक्रमांच्या माध्यमातून १२ लाख ४५ हजार ७५ रुपये मंदिर समितीला मिळाले आहेत. याशिवाय ३ इलेक्ट्रिक रिक्षा व एक बसच्या मध्यमातून ३२ लाख इतके उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com