Swelling on Face: सकाळी उठल्यावर चेहरा सूजलेला का असतो? शरीर देत असलेले संकेत ओळखा

Body signals face swelling explained: अनेकांना सकाळी उठल्यावर चेहरा फुगल्यासारखा किंवा सुजल्यासारखा वाटतो. हे फक्त सौंदर्याशी संबंधित नसून शरीर देत असलेले आरोग्य संकेत आहेत.
Body signals face swelling explained
Body signals face swelling explainedsaam tv
Published On

सकाळी उठल्यावर अनेकांना आपला चेहरा आरशात पाहण्याची सवय असते. अशावेळी काहींना आपला चेहरा पाहिल्यानंतर काहीसा सुजलेला वाटतो. ही सूज कमी करण्यासाठी आपण बरेच उपाय करतो. काहींच्या म्हणण्यानुसार, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे चेहऱ्याला सूज येते. हे असं नाहीये. चेहऱ्यावर सूज येण्याचं कारण मीठाचं प्रमाण कमी होणं, कमी पाणी पिणं आणि झोपेचा अभाव, जळजळ आणि शरीरातील हार्मोनल संतुलन यामुळे असू शकतं.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टनुसार, जर कोणी व्यक्ती फक्त मीठाचं प्रमाण कमी करून किंवा डाइयूरेटिक्स औषधांच्या मदतीने चेहऱ्याची सूज दूर करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे त्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. कारण आपलं शरीर हे सूज, पोटफुगी, इन्फ्लामेशन याद्वारे काही संकेत देतं. यासाठी ही लक्षणं ओळखणं गरजेचं आहे.

Body signals face swelling explained
Heart Blockage: जास्त धावपळीमुळे वाढेल हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी सांगितली ही ४ लक्षणं, वाचून व्हाल चकीत

सूज येण्याची कारणं

न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार, मीठाला कारणीभूत ठरवण्यापेक्षा शरीराच्या खऱ्या गरजा समजून घेणं गरजेचं आहे. कारण मीठाचं प्रमाण कमी केल्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा धोका कमी असतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला सूज येऊ शकते. त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्याने देखील चेहऱ्याला सूज येण्याचा धोका असतो. पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्याने देखील हार्मोनवर परिणाम होतो आणि चेहऱ्याला सूज येऊ शकते.

यावर कसे कराल उपाय?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपलं संपूर्ण शरीर एका सिस्टीमॅटीक पद्धतीने काम करतं. मात्र ज्यावेळी यामध्ये कोणतीही समस्या दिसून येत तेव्हा सूज येण्याचा धोका दिसून येतो. त्यामुळे लक्षणं कमी करण्यापेक्षा तुम्ही मूळ समस्येवर काम केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला चांगला आहार घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुरेसं पाणी प्या, चांगली झोप आणि योग्य जीवनशैली जोपासा.

Body signals face swelling explained
When Can Having Physical Prevent Pregnancy : कोणत्यावेळी लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा टाळता येऊ शकते?

जर सकाळी उठल्यावर तुमच्या चेहऱ्याला सूज येत असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयींवर लक्ष ठेवलं पाहिजे. अशावेळी तुम्ही तुमच्या डेली रूटीवरही लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला कोणता ताण असेल तर त्यावर उपाय केला पाहिजे.

Body signals face swelling explained
Toilet flush: टॉयलेटचं झाकण बंद करून फ्लश केल्यानंतर काय होतं? संशोधकांनी सांगितलं धक्कादायक सत्य

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com