Toilet flush: टॉयलेटचं झाकण बंद करून फ्लश केल्यानंतर काय होतं? संशोधकांनी सांगितलं धक्कादायक सत्य

Toilet lid flush research truth: अनेकांना वाटतं की शौचालयाचं झाकण बंद करून फ्लश केल्यास जंतूंचा प्रसार कमी होतो. अलीकडील संशोधनातून काय समोर आलं आहे ते पाहूयात.
Toilet lid flush research truth
Toilet lid flush research truthsaam tv
Published On

शौचालयाचा वापर झाल्यानंतर फ्लश हे केलंच पाहिजे. अशावेळी आपण फ्लशचं बटन दाबून निघून जातो. त्यानंतर आपण वॉशरूमच्या बाहेर येऊन आपली दैनंदिन कामं करतो. पण फ्लश केल्यानंतर नेमकं काय घडतं यावर संशोधक बऱ्याच काळापासून अभ्यास करतायत.

American Journal of Infection Control मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात टॉयलेटचं झाकण उघडं आणि बंद असताना फ्लश केल्यावर बाथरूममध्ये कशाचा प्रसार होतो याचा अभ्यास करण्यात आला.

संशोधकांना अभ्यासातून काय समोर आलं?

संशोधकांनी हवेत पसरलेल्या सूक्ष्म कणांचा अभ्यास केला. फ्लश केल्यानंतर हे कण कुठे पसरतात याचीही संशोधकांनी माहिती घेतली. यावेळी समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. फ्लश केल्यावर अदृश्य थेंब जवळच्या पृष्ठभागांवर जातात आणि झाकण बंद केलं तरी त्यांचा प्रसार पूर्णपणे थांबत नाही.

Toilet lid flush research truth
Symptoms of heart attack in kids: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणं; पालकांनी दुर्लक्ष करू नये

झाकण बंद केल्यावरही हवा कशी बाहेर येते?

अभ्यासात फ्लश केल्यावर टॉयलेट पॉटमधून सूक्ष्म कण वर कसे येतात याची माहिती घेण्यात आली. हे कण डोळ्यांना दिसत नाहीत आणि हवेसोबत वेगाने पसरतात. आश्चर्याची बाब म्हणजे झाकण बंद केलं तरी काही कण बाहेर येऊन बाथरूममध्ये पसरतात. याचा अर्थ झाकणाचा उपयोग नाही असं नाही. मुळात शौचालय पूर्णपणे सीलबंद नसतें झाकण आणि सीटभोवतीच्या फटींमधून हवा आणि थेंब बाहेर पडू शकतात.

झाकण बंद करणं का गरजेचं आहे?

झाकणामुळे पाण्याचे सर्व थेंब अडवले जात नाही, मात्र यामुळे फ्लशची दिशा बदलते. पाण्याचे मोठे थेंब थेट बाहेर जाण्याऐवजी झाकणाच्या आतील बाजूला आदळतात. हे घरगुती वापरात महत्त्वाचं ठरतं. कारण जवळच टूथब्रश, टॉवेल्स या गोष्टी असतात. झाकण बंद केल्याने उडणारे थेंब कमी होतात. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

Toilet lid flush research truth
Symptoms of heart attack in kids: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणं; पालकांनी दुर्लक्ष करू नये

शौचालय स्वच्छतेसाठी इतर महत्त्वाचे उपाय

  • फक्त झाकण बंद करणं पुरेसं नाही. स्वच्छतेसाठी अनेक सवयींचा जोपासणं आवश्यक आहे.

  • टॉयलेट सीट, हँडल आणि जवळच्या पृष्ठभागांची नियमित साफसफाई महत्त्वाची आहे.

  • बाथरूममध्ये योग्य वेंटिलेशन असणं आवश्यक आहे. हवा खेळती नसेल तर कण जास्त वेळ टिकू शकतात.

  • वैयक्तिक वस्तू शौचालयाजवळ ठेवणं टाळा.

झाकण बंद करण्यामागील कारणं

झाकण बंद करणं ही एक जागरूकता मानली जाते. फ्लश केल्यावर फक्त पाणी हलत नाही, तर सूक्ष्म कणही हलतात. झाकण सर्व थेंब अडवत नाही तर प्रसारही थोडा कमी करतात. स्वच्छता आणि वेंटीलेशन ही सवय संसर्गाचा धोका कमी करते.

Toilet lid flush research truth
Heart Attack Symptoms: हाता-पायांवर ही लक्षणं दिसली तर हार्ट अटॅक येऊ शकतो; उशीर करणं पडेल महागात

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com