Heart Blockage: जास्त धावपळीमुळे वाढेल हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी सांगितली ही ४ लक्षणं, वाचून व्हाल चकीत

Heart Blockage Symptoms: धावपळ, ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतो. शरीर आधी संकेत देते, त्याकडे दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅकसारखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
heart blockage causes
Heart Blockagegoogle
Published On

सध्याची लाइफस्टाइल प्रचंड बदलली आहे. लोकांना मामसांपेक्षा सोशल मीडिया किंवा त्यांचा मोबाइल जास्त महत्वाचा वाटायला लागलाय. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर, राहणीमानावर किंवा त्यांच्या खाण्याच्या शैलीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. लोकांना सतत फास्ट फूड्सच्या ऑफर्स मोबाईलवर येत असतात. त्यामुळे अनेकजण '' कमी पैशात आहे म्हणून खाऊ'' असा विचार करतात. पण याचा परिणाम तुमच्या ह्रदयावर होत असतो. यामुळे तुम्हाला हार्ट ब्लॉकेज (heart blockage)सारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जेव्हा ह्रदयापर्यंत रक्त सुरळीतपणे पोहोचतच नाही, तेव्हा त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट ब्लॉकेज असं म्हटलं जातं. हार्ट ब्लॉकेज अचानक होत नाही. शरीर याआधी याची संकेतं देतं. पण बऱ्याचदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळेत हे संकेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य वेळी उपचार केले नाही तर हार्ट अटॅकसारखी जीवघेण्या परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.

heart blockage causes
Sunday Horoscope: नकारात्मक विचार टाळा, ४ राशींच्या आर्थिक अडचणी दूर होणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

हार्ट ब्लॉकेज अचानक होत नाही. शरीर याआधी अनेक संकेत देत असते, पण अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळेत हे संकेत ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हार्ट अटॅकसारखी जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे पुढील प्रमाणे

हार्ट ब्लॉकेजचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे. छातीत जडपणा जाणवणे, जळजळ, दाब किंवा घट्टपणा जाणवणे हे अँजायनाचे लक्षण असू शकते. ही वेदना सहसा ताणतणावात, धावपळ किंवा जास्त शारीरिक श्रम करताना वाढते आणि आराम केल्यानंतर कमी होते. यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. हेही हार्ट ब्लॉकेजचे महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. कमी काम करूनही किंवा जिने चढताना जास्त धापा लागणे म्हणजे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याचा संकेत असू शकतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

दैनंदिन कामे करतानाही सतत थकवा जाणवणे हे सुद्धा हृदयाशी संबंधित समस्या दर्शवू शकते. हृदय शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवू शकत नसल्यामुळे हा थकवा येतो आणि तो हार्ट ब्लॉकेजचा इशारा असू शकतो. कधी कधी हृदयातील वेदना फक्त छातीतच न राहता डाव्या हातात, मानेला, पाठीवर किंवा घश्यापर्यंत पसरू शकतात. हृदयाचे ठोके अचानक खूप वेगाने धडधडणे किंवा अचानक बिघडणे ही लक्षणेही धोक्याची घंटा असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

heart blockage causes
Walking Health: नव्या वर्षात रोज १०००० पावलं चालण्याचा संकल्प केलाय! सगळ्यांनाच सूट होणार का? एक्स्पर्ट्सनं सांगितले ५ साइड इफेक्ट्स

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com