Saam Tv
वैयक्तिक जीवन आनंदी आणि सुखद संधीनी पूरेपूर असेल. मित्रांना विश्वासू सल्लागार म्हणून काम कराल. घरच्यांशी सल्लामसलत करणं गरजेचं.
स्वतःला एका विशिष्ट मूड मध्ये ठेवाल. काही अडचणी सूटत नसतील तर मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करा. आपल्यातील दोष स्वीकार करा.
उद्योगात यश मिळेल. फक्त उद्योगांतील संबंध सांभाळून निर्णय घ्यावा. स्वामी समर्थांची उपासना केल्यास उत्तम.
अनपेक्षित जूने परिचित लोकं भेटतील. नवीन कार्य सूरु करण्यास उत्तम दिवस. शंकराची उपासना करावी.
आर्थिक लाभ होईल. सल्लागार लोकांना भरपूर क्लायंट भेटतील. पैसे मोजायला वेळ भेटणार नाही. गुरू उपासना करावी.
बॅंकेत/फायनान्स क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक सन्मान भेटेल. लोखंड, तेल, सोने उद्योजकांना देखील लाभ होईल. शनि उपासना गरजेची आहे.
प्रेमात यश भेटेल (प्रेयस/प्रेयसी). अतिशय आनंदी आणि निवांत असा दिवस आहे. भरपूर आराम करा आणि विशेष महत्वाच्या कामात लक्ष घालू नका.
रागावर आणि तोंडातून निघणाऱ्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. शरीरातील रक्तदाब तपासून घ्या. भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणात वेळ घालवा.
पारिवारिक संबंध जपायचे आहेत. एखाद्या सामाजिक संस्थेत सेवा देवुन वेळ घालवा. आईच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घ्यावी.
आर्थिक अडचणी दूर होतील. जूनी संपत्ती विकायची असल्यास विषयावर चर्चा करा. चांदीचे अलंकार विकत घेतल्यास भरपूर फायदा होईल.
गुळ आणि धने खाऊन घराबाहेर पडावं. कमरेखालचे अवयव दुखतील. योग्य उपचार घ्यावा. दत्तगुरुंची उपासना करावी किंवा नामस्मरण करावे.
खऱ्या अर्थाने रविवारी साजरा कराल. अंगात आळस आणि आरामदायी वृत्ती दिवसभर राहील. कृपया सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या. म्हणजे आळस आणि आराम याची सांगड घालून काम करता येईल.