Sakshi Sunil Jadhav
बरेच दिवस लहान मुलांसाठी काही चटपटीत बनवलं नसेल तर हेल्दी सॅंडविच हा बेस्ट पर्याय आहे. पुढे आपण याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
पालक कॉर्न सँडविच हा पौष्टिक नाश्ता असतो. याने दिवसाची सुरुवात उत्साहात होईल.
पालक न आवडणाऱ्या मुलांनाही हे सँडविच आवडते. त्यामुळे पालेभाज्यांची सवय मुलांना लागते.
पालकमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर आहेत.
कमी तेलात तयार होणारा हा सँडविच डाएटवर असणाऱ्यांसाठीही उत्तम आहे.
ब्रेडमध्ये पालक, कॉर्न, थोडं चीज ठेवा. पुढे हे तव्यावर किंवा ओवनमध्ये ठेवा.
पालक कॉर्न सँडविच हिरव्या चटणी किंवा सॉससोबत खाल्ल्याने चव आणखी वाढते.