आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशीला रमा एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवसांपासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा ही एकादशी ९ नोव्हेंबरला आहे. तसेच या दिवशी वसुबारस आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे.
या एकादशीला रंभा एकादशी असेही म्हटले जाते. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहाते. तसेच धनसंपत्ती आणि सर्व सुख प्राप्तीसाठी, विवाहात उशीर होत असल्यास हे व्रत केल्याने अनेक समस्यांपासून सुटका होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. रमा एकादशी शुभ मुहूर्त
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी (Ekadashi) तिथी सकाळी ८ नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ८.२३ पासून होईल तर ९ नोव्हेंबरला सकाळी १०.४१ वाजता संपेल.
रमा एकादशीचे व्रत - ९ नोव्हेंबर
2. रमा एकादशी पूजा मुहूर्त
एकादशी पूजेची शुभ वेळ (Time) - ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३९ ते ८.५० दरम्यान
एकादशी व्रताचे पारण- ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३९ ते ८.५० दरम्यान
3. रमा एकादशी व्रताच्या दिवशी हे नियम पाळा
एकादशीला चुकूनही भाताचे (Rice) सेवन करू नये
रमा एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये.
एकादशी व्रताच्या दिवशी तामसिक गोष्टींपासून दूर राहा.
जर तुम्ही एकादशी व्रत करत असाल तर खोटे बोलणे टाळा आणि कोणाचाही अनादर करू नका.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.