Vasubaras 2023 : वसुबारस कधी आहे? गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Govatsa Dwadashi 2023 : गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? पूजेचा मुहूर्त काय? जाणून घेऊया याबद्दल
Vasubaras 2023
Vasubaras 2023Saam Tv
Published On

Vasubaras 2023 Tithi :

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण. या दिवसात आपल्या सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. तसेच फटाके, रांगोळी आणि दिव्यांची आरास म्हणून हा सण ओळखला जातो.

या पाच दिवसात सर्वत्र प्रकाश पाहायला मिळतो. तसेच प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. यंदा दिवाळीचा हा सण ९ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून १५ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. दिवाळीची सुरुवात ही वसुबारस सणाने होते. हा सण या वर्षी ९ नोव्हेंबरला साजरा केला जाईल. गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? पूजेचा मुहूर्त काय? जाणून घेऊया याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. वसुबारस कधी आहे?

आश्विन कृष्ण पक्ष एकादशी गुरुवार, ९ नोव्हेंबरला वसुबारसचा सण साजरा केला जाईल. वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे. या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य (Food) दाखवला जातो.

Vasubaras 2023
Diwali Date 2023 : वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या योग्य तिथी

2. पूजा मुहूर्त

वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय-वासराची पूजा करतात. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी ०५.३१ मिनिटे ते ०८.०९ मिनिटांपर्यंत आहे.

Vasubaras 2023
Most Dangerous Fort In Thane : ठाण्याच्या कुशीत वसलेला खतरनाक किल्ला, सह्याद्रीचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सना भुरळ

3. पूजा पद्धत

या दिवशी दारात रांगोळी (Rangoli) काढून दिव्यांची आरास केली जाते. दिवाळीचा पहिला सण आणि पहिला दिवा या दिवशी लावला जातो. गावाकडच्या भागात सुवासिनी स्त्रिया गाय- वासरुची पूजा या दिवशी करतात. गायीच्या पायांवर पाणी घालून हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात, ओवाळतात. पुरणपोळीचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवतात. शहराकडच्या भागात घरोघरी मातीच्या गाय-वासराची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या (Diwali) सणाला सुरुवात होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com