जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सतत काही ना काही खात असतो. यामध्ये काही पदार्थ हे चटकदार असतात तर काही आरोग्यदायी. अशातच खाण्या-पिण्याची योग्य वेळ आपल्या शरीरावर परिणाम करते.
अनेकांना सवय असते की, कामाच्या गडबडीत अनेकजण नाश्ता वगळतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात हे अधिक प्रमाणात खातात. सकाळचा नाश्ता वगळल्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. वात, पित्त आणि कफवर परिणाम होऊन संतुलन बिघडते. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.
1. ४ ते ५ तासांचे अंतर
भारतात तीन वेळा जेवण केले जाते. सकाळचा नाश्ता (Morning Breakfast), दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. दोन्ही जेवणाच्या वेळी चार तासांचे अंतर असायला हवे कारण जेवण पचण्यास अधिक वेळ लागतो. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळीत किमान १२ तासांचे अंतर असायला हवे. आपल्या प्रत्येकाचा सकाळी उठण्याची वेळ ही वेगळी असते. त्यामुळे जेवणाची वेळ ही बदलते. अशातच सकाळी उठल्यानंतर ३ तासाच्या आत आपल्याला नाश्ता करायला हवा. जर तुम्ही सकाळी ६ वाजता उठत असाल तर तुम्ही ९ च्या आत नाश्ता करायला हवा.
2. नाश्ता वगळू नका
सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. यासाठी सगळ्यात चांगली वेळ ही सकाळी ७ ते ९ आहे. परंतु, काही लोक कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता हा दुपारच्या जेवणाच्या वेळी करतात. ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंगसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते.
सकाळी योग्य वेळी नाश्ता केला तर दुपारी जेवण १२.३० ते २ च्या मध्ये करायला हवे. यावेळी आपले मेटाबॉलिज्म सगळ्यात चांगले काम करते. यामुळे जेवणही चांगल्याप्रकारे पचते. जर तुम्ही कामात व्यस्त असाल तर जास्तीत जास्त तीन वाजता जेवण करा.
3. दुपारच्या जेवणात उशीर नको
काही लोकांना कामाच्या गडबडीत जेवण करता येत नाही. त्यामुळे ते कधी कधी ४ वाजता जेवतात असे करणे चुक आहे. उशिरा जेवल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच वजनही झपाट्याने वाढेल.
4. रात्रीचे जेवण कधी?
रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या २ ते ३ तासांपूर्वी करायला हवे. परंतु, रात्रीही लवकर जेवायला हवे. रात्री जेवण्याची योग्य वेळ ही ७ ते ८ असायला हवी. रात्री उशिरा जेवल्याने अपचनाची समस्या वाढते. त्यामुळे ताण येतो आणि झोप खराब होते. शरीरातील चरबी देखील वाढते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.