Spinal TB Disease: तरुणांमध्ये वाढतोय स्पाइनल टीबीचा आजार? लक्षणे कोणती? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Spinal TB Causes : अगदी कमी वयात तरुणांना पाठीच्या मणक्याच्या टीबीला सामोरे जावे लागते आहे. ज्याला स्पाइनल टीबी म्हटले जाते.
Spinal TB Disease
Spinal TB DiseaseSaam tv
Published On

Spinal TB Symptoms :

टीबी हा अतिशय गंभीर आणि संसर्गजन्य आजार आहे. ज्याला क्षयरोग म्हणूनही ओळखले जाते. टीबीमुळे फुफ्फुसाचे आजार होतात. यामुळे व्यक्तीला सतत खोकला येत राहातो.

अगदी कमी वयात तरुणांना पाठीच्या मणक्याच्या टीबीला सामोरे जावे लागते आहे. ज्याला स्पाइनल टीबी म्हटले जाते. हा आजार कसा होतो? याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया सविस्तर

1. स्पाइनल टीबी म्हणजे काय?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा मायकोबॅक्टेरियम नावाचा जंतू स्पाइनल कॉर्ड टिश्यूमध्ये पोहोचतो तेव्हा तेथे संसर्ग होतो, ज्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये (Spinal) टीबीची समस्या उद्भवते. मणक्यातील टीबी इंटरव्हर्टेब्रल डिस्कमध्ये सुरू होतो. यानंतर ते पाठीच्या कण्यामध्ये पसरते. वेळेवर उपचार (Treatment) न मिळाल्यास अपंगत्व येते.

Spinal TB Disease
Most Dangerous Fort In Nashik : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नाशिकमधील भयावह किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून पर्यटकांना पडते भुरळ!

2. स्पाइनल टीबीची कारणे?

स्पाइनल कॉर्डचा टीबी हा रक्तातून होणारा संसर्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो तेव्हा जीवाणू रक्तामध्ये प्रवेश करतात, त्यानंतर ते रक्ताद्वारे शरीरात, पाठीचा कणा आणि गुडघ्यांपर्यंत पोहोचतात. जिवाणू शरीरात जिथे जिथे प्रवेश करतात तिथे पू तयार होतो आणि संसर्ग होतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे हा जीवाणू तुम्हाला टीबीचा त्रास देऊ शकतो.

3. स्पाइनल टीबीची लक्षणे?

  • पाठदुखी

  • वजन कमी होणे (Weight Loss)

  • वारंवार येणारा ताप

  • भूक न लागणे

  • अशक्त वाटणे

  • हाडे कमकुवत होणे

  • घसा दुखणे

Spinal TB Disease
Online Blackmailing : सेक्सटॉर्शनपासून सावधान, अशी घ्या खबरदारी

4. स्पाइनल टीबीची कसा ओळखवा?

स्पाइनल टीबी शोधण्यासाठी एक्स-रे केला जातो. एक्स-रेमध्येही हा आजार आढळला नाही, तर सीटी-एमआरआयही करता येतो. यावरून कळते की, कोणत्या टिश्यूचा समावेश आहे आणि तुमचे हाड किती प्रमाणात बिघडले आहे.याशिवाय बायोप्सीद्वारे देखील ते शोधले जाते. जेव्हा स्पाइनल टीबीची लक्षणे दिसतात तेव्हा औषधांसह अँटीट्यूबरक्युलर थेरपी असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com