

तोंड हे केवळ सुंदर हास्यासाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. तोंडाची योग्य स्वच्छता न राखणं, तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यामुळे तोंडाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तोंडातील बॅक्टेरियामुळे हिरड्यांचे आजार होण्याबरोबरच शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या जीवनात तोंडाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, तोंडाच्या काही आजारांचा त्रास जगभरातील अनेक लोकांना आहेत. तंबाखूचं सेवन हे तोंडाच्या कॅन्सरसाठी महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखण्यासोबतच तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात व्यवस्थित स्वच्छ करावेत. यामुळे दातांवर साचणारा प्लाक आणि अन्नकण कमी करण्यास मदत होते.
घाईघाईने ब्रश करण्याऐवजी किमान दोन मिनिटे दात घासावेत. दातांच्या पुढील आणि मागील भागासोबतच हिरड्यांच्या कडांचीही योग्य स्वच्छता करावी.
ब्रश करताना दातांच्या मधील बारीक जागा पूर्णपणे स्वच्छ होतातच असे नाही. त्यामुळे फ्लॉसचा वापर करून दातांमधील अन्नकण आणि प्लाक काढण्यास मदत होते. माउथवॉशचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येतो.
दात दुखत नाहीत म्हणजे दात पूर्णपणे निरोगी आहेत, असं नाही. काही समस्या सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी दंततज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
तंबाखू आणि धूम्रपानामुळे तोंडाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गुटखा, खैनी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांसोबतच धूम्रपानापासूनही दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
तोंडात असलेले बॅक्टेरिया आणि हिरड्यांचे आजार यांचा शरीराच्या एकूण आरोग्याशी संबंध असल्याचं वैद्यकीय अभ्यासातून समोर आलंय. विशेषतः हिरड्यांचे आजार आणि मधुमेह यांच्यात परस्पर संबंध आढळतो. मात्र तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे थेट मधुमेह होतो, असं म्हणणं योग्य नाही.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.