Thigh size: मांडीचा आकार सांगतो तुम्ही किती वर्षे जगणार? नव्या संशोधनातील धक्कादायक खुलासा

Are Bigger Size Healthy: मांड्यांचा आकार आणि स्नायूंची ताकद तुमच्या आरोग्याबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकते, असे संशोधनातून समोर आले आहे. मजबूत मांड्यांचे स्नायू हृदयविकाराचा धोका कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगण्यास मदत करू शकतात.
Thigh size
Thigh sizeSAAM TV
Published On

आपली तब्येत चांगली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक तपासण्या आणि वेगवेगळे निकष वापरले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मांड्यांचा आकारही तुमच्या आरोग्याबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकतो? इतकंच नाही तर तुम्ही किती वर्ष जगणार हे आता तुमच्या मांड्यांचा आकार ठरवू शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि डेन्मार्कमधील संशोधकांनी केलेल्या दीर्घकालीन अभ्यासात मांड्यांचा आकाराचा आणि आरोग्याचा संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. या संशोधनाचा उल्लेख गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये केलाय.

Thigh size
Blood Sugar Control: ब्लड शुगर अचानक वाढतेय? सकाळच्या या ५ सवयी रक्तातील साखर ठेवतील नियंत्रणात

मांड्यांचा आकार आणि आरोग्याचा काय संबंध?

डॉ. सौरभ सेठी यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 3,000 प्रौढ व्यक्तींवर 12 वर्षे अभ्यास करण्यात आला. या संशोधनात असं दिसून आलंय की, ज्यांच्या मांड्या खूप बारीक किंवा आकाराने लहान होत्या, त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक होता. तसंच अशा व्यक्तींमध्ये अकाली मृत्यू होण्याचं प्रमाणही जास्त आढळलं.

मात्र याठिकाणी फक्त मांड्यांवरच्या चरबीचा विषय नाही. मुख्य मुद्दा म्हणजे मांड्यावरील स्नायू (मसल्स). आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या स्नायूंच्या गटांपैकी मांड्यावरचे स्नायू महत्त्वाचे मानले जातात. जर मांड्यांचे स्नायू मजबूत असतील तर त्याचे अनेक फायदे होतात. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होतो आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.

कोणत्या सवयी ठरू शकतात फायदेशीर?

डॉ. सेठी यांच्या मते काही साध्या सवयी मांड्यांचे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये–

  • नियमित जिने चढणे

  • चढावाच्या रस्त्यावर चालणे किंवा चढाई करणे

  • स्क्वॉट्स मारणं

  • खुर्चीवरून उठताना हाताचा आधार न घेणं

या सवयी केवळ पायांचे स्नायू मजबूत करत नाहीत, तर दीर्घकाळ निरोगी राहण्यासही मदत करतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतं की, ज्यांच्या मांड्यांमध्ये निरोगी स्नायू असतात, त्यांना अनेक गंभीर आजारांचा धोका तुलनेने कमी असतो आणि ते अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकतात.

Thigh size
High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

मांड्याचे स्नायू मजबूत करण्यासाठी काय करावं?

  • मांड्यांचे स्नायू बळकट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार दोन्ही महत्त्वाचे आहेत.

  • कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा नियमित सराव करा.

  • लंजेस, स्टेप-अप्स आणि स्क्वॅट्स हे व्यायाम जांघांचे स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत.

  • सायकल चालवणं तसंच जिने चढणं-उतरणं हे कार्डिओ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी चांगले पर्याय आहेत.

  • आहारात प्रोटीन पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. त्यासाठी डाळी, अंडी, सोयाबीन आणि मांसाहार यांचा समावेश करता येतो.

  • पुरेसं पाणी पिणंही तितकेच महत्त्वाचं आहे. शरीर हायड्रेट राहिल्यास व्यायाम करताना स्नायूंवर अतिरिक्त ताण येत नाही आणि स्नायू आखडण्याचा त्रासही कमी होतो.

Thigh size
Childhood cancer: लहानपणी कॅन्सर झाला होता? मग ही माहिती नक्की वाचा, उपचारांचे 'हे' दुष्परिणाम 30 वर्षांनीही येतात समोर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com