Blood Sugar Control: ब्लड शुगर अचानक वाढतेय? सकाळच्या या ५ सवयी रक्तातील साखर ठेवतील नियंत्रणात

Diabetes Management: सकाळच्या काही सोप्या सवयी जसे की उठल्याबरोबर पाणी पिणे, संतुलित नाश्ता करणे, नियमित व्यायाम, ताणतणाव कमी ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी या सवयी उपयुक्त ठरतात.
blood sugar control
blood sugar controlgoogle
Published On

आपली सकाळ कशी सुरू होते याचा परिणाम फक्त मूडवरच होत नाही तर दिवसभर रक्तातील साखरेच्या (पातळीवरही होऊ शकतो. काही आजार आणि एकूण आहार यांचा ब्लड शुगरवर परिणाम होत असला तरी सकाळच्या काही चांगल्या सवयी अंगीकारल्यास रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहण्यास मदत होऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या मते, मधुमेह हा जगभरातील सर्वाधिक आढळणाऱ्या दीर्घकालीन आजारांपैकी एक आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली ठेवणं हा मधुमेह टाळण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे.

blood sugar control
Bad cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठलीये? हे 6 डिंक्स खेचून बाहेर काढतील वाईट कोलेस्ट्रॉल

उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्या

रात्री अनेक तास झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता झालेली असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यास मदत होते. तसंच चयापचय सुधारण्यास मदत होऊ शकते.

सकस आणि संतुलित नाश्ता करा

अनेकजण नाश्ता टाळतात किंवा बिस्किटं, केक, पेस्ट्री, साखर जास्त असलेले पदार्थ यांसारखे पदार्थ खातात. त्यामुळे ब्लड शुगरमध्ये अचानक चढ-उतार होऊ शकतात. सकाळच्या नाश्त्यात संपूर्ण धान्य, प्रोटीन, चांगल्या प्रकारचे फॅट्स आणि फायबर असलेले पदार्थ असावेत.

blood sugar control
High cholesterol: ही ६ ड्रिंक्स रक्तवाहिन्यांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

सकाळी थोडा व्यायाम करा

शारीरिक हालचाल केल्याने स्नायू रक्तातील साखरेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करतात. नियमित व्यायामामुळे इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करतं. त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यासाठी हेवी व्यायाम करण्याची गरज नाही. सकाळी 20 ते 30 मिनिटं चालणं, हलका स्ट्रेचिंग किंवा हलकं स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तरी त्याचा फायदा होतो.

सकाळचा ताण कमी ठेवा

सकाळच्या वेळी शरीरात कॉर्टिसॉल हा ताण वाढवणारा हार्मोन नैसर्गिकरित्या वाढलेला असतो. जास्त ताणतणाव असल्यास काही लोकांमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं अधिक कठीण होऊ शकतं. म्हणून दिवसाची सुरुवात शांतपणे करा.

blood sugar control
High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या 4 भाज्या नक्की खा!

दररोज पुरेशी झोप घ्या

ब्लड शुगर नियंत्रणाची सुरुवात रात्रीच्या चांगल्या झोपेपासूनच होते. अपुरी झोप घेतल्यास शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पुढे जाऊन टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. दररोज किमान 7 ते 9 तास चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com