High cholesterol: ही ६ ड्रिंक्स रक्तवाहिन्यांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं

चुकीचा आहार, जास्त तळलेले पदार्थ आणि साखरेचं अधिक सेवन यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचून ब्लॉकेज तयार होऊ शकतात. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

heart health | saam tv

जीवनशैलीतील बदल

दररोज नियमित व्यायाम केल्याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होतं. फायबरयुक्त आहार घेतल्यास शरीरातील चरबीचं प्रमाण नियंत्रित राहतं. तणाव कमी ठेवणं आणि पुरेशी झोप घेणंही हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

bad cholesterol | saam tv

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅवोनॉइड्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक LDL कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्यांतील इन्फ्लामेशन कमी करतात. साखर न घालता नियमित ग्रीन टी घेतल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते.

good cholesterol | saam tv

डाळिंबाचा रस

डाळिंबाच्या रसात अँटिऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेशन रोखतात. यामुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होण्याचा धोका कमी होतो. मात्र कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी याचे सेवन काळजीपूर्वक करावं.

heart attack risk | saam tv

सोया दूध

सोया दुधात वनस्पतीजन्य प्रोटीन असतं जे LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे HDL म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही मदत करतं. साखर न घालता सोया दूध नियमित सेवन केल्यास हृदयासाठी फायदेशीर ठरते.

tomato juice heart | saam tv

टोमॅटो ज्यूस

टोमॅटो ज्यूसमध्ये लाइकोपीन नावाचा अँटिऑक्सिडंट असतो जो हृदयाचे संरक्षण करतो. तो LDL कमी करून HDL थोड्या प्रमाणात वाढवण्यास मदत करतो. मीठ न घालता टोमॅटो ज्यूस घेतल्यास अधिक फायदा मिळतो.

flavonoids health | saam tv

बीटरूट ज्यूस

बीटरूट ज्यूसमध्ये बेटानिन आणि पॉलिफेनॉल्स असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. हे घटक सूज कमी करून रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतात. कमी फॅट आणि कमी सोडियम असल्यामुळे हे हृदयासाठी उत्तम नैसर्गिक पेय आहे.

betanin compounds | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart attack symptoms | saam tv
येथे क्लिक करा