Mouth Cancer: सिगारेट न ओढणाऱ्यांमध्येही वाढतोय तोंडाचा कॅन्सर; तरूणांनी या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नये

Why Are Non Smokers Getting Mouth Cancer: भारतामध्ये तरुणांमध्ये तोंडाच्या कॅन्सरची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. गुटखा, सुपारी आणि पान मसाल्याच्या सेवनामुळे हा धोका वाढत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केल्यास आजार वेगाने पसरू शकतो.
Why Are Non Smokers Getting Mouth Cancer
Why Are Non Smokers Getting Mouth Cancersaam tv
Published On

तोंडाचा कॅन्सर हा प्रामुख्याने वृद्ध पुरुषांना, दीर्घकाळ सिगारेट किंवा तंबाखूचं सेवन करणाऱ्यांना होतो असं मानलं जातं होतं त्यांना होणारा आजार मानला जात होता. पण आता भारतातील डॉक्टरांना एक अत्यंत चिंताजनक बदल दिसून येतोय. विशी आणि तिशीतील तरुण पुरुष ज्यांपैकी अनेकांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही त्यांना तोंडाचा कॅन्सर दिसून आला आहे.

काही जण फिटनेसचा विचार करतात किंवा काहींनी सिगारेटला कधी हातही लावलेला नाहीये. अनेक जण नुकतंच आपल्या करिअरची सुरुवात करतायत तर नुकतंच काहींचं लग्न झालंय. असं असूनही डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. भारतात तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, तंबाखू आणि सुपारी यांच्या वापरामुळे तोंडाचा कॅन्सर हा देशातील सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. दरम्यान डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, हा धोका केवळ धूम्रपानापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचं स्वरूप बदललंय.

Why Are Non Smokers Getting Mouth Cancer
Dark neck remedies: सतत घाम येऊन मान काळी पडलीये? या एका घरगुती उपायाने काळवंडलेली मान होईल स्वच्छ

अपोलो हॉस्पिटल्समधील वरिष्ठ सल्लागार आणि हेड आणि नेक कॅन्सरचे तज्ज्ञ डॉ. अक्षत मलिक यांनी टीओआयला सांगितलं की, तरुणांमध्ये सर्वात मोठा गैरसमज हा आहे की केवळ सिगारेट ओढल्याने तोंडाचा कॅन्सर होतो. पूर्वी तोंडाचा कॅन्सर हा दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या वृद्ध पुरुषांचा आजार मानला जात होता. पण आता ४० वर्षांखालील लोकांमध्ये धूम्रपान न करणाऱ्यांचाही समावेश आहे. या आजाराची प्रकरणं झपाट्याने वाढतायत.

Why Are Non Smokers Getting Mouth Cancer
Dark Neck Skin: मानेभोवती काळपटपणा साचलाय? दुर्लक्ष नको, ‘या’ गंभीर आजारांचं असू शकतं सुरुवातीचं लक्षण

डॉ. मलिक यांनी सांगितलं की, तोंडाच्या कॅन्सरचे बहुतेक रुग्ण सिगारेट ओढत नाहीत तर ते गुटखा, खैनी, पान मसाला, सुपारी किंवा पान यांसारख्या तंबाखूच्या इतर प्रकारांचा वापर करतात. हे पदार्थ हिरड्या आणि गालांच्या आतील भागाच्या संपर्कात दीर्घकाळ राहतात. ज्यामुळे पेशींचं सतत नुकसान होतं. परिस्थिती दिर्घकाळ अशीच राहिली तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं.

Why Are Non Smokers Getting Mouth Cancer
Diabetes Symptoms: अचानक हे ५ बदल दिसले तर समजा शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय, वेळीच लक्षणं ओळखा

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे तरुण लोकांमध्ये तोंडाचा कॅन्सर अधिक वेगाने पसरू शकतो. डॉ. मलिक यांच्या मते, तरुण लोकांमध्ये तोंडाचा कॅन्सर हा वेगाने पसरू शकतो. या आजारातील सर्वात मोठा धोका म्हणजे त्याचं उशिरा निदान होणं. सुरुवातीची लक्षणं अनेकदा किरकोळ वाटतात. ही लक्षणं म्हणजे तोंडात बराच काळ टिकणारी जखम, पांढरे किंवा लाल डाग, जेवताना जळजळ होणं, गिळण्यास त्रास होणं किंवा मानेवर गाठ येणं. ही लक्षणं सामान्य समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com