Dark neck remedies: सतत घाम येऊन मान काळी पडलीये? या एका घरगुती उपायाने काळवंडलेली मान होईल स्वच्छ

Surabhi Jayashree Jagdish

मानेवर काळेपणा का येतो?

सतत घाम येऊन धूळ साचण्याने मानेवर काळेपणा येतो. अनेकदा सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि त्वचेची योग्य स्वच्छता न केल्यानेही त्वचा काळवंडते. त्यामुळे मान नियमित स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असतं.

Dark neck remedies

घरगुती

मानेचा काळेपणा घालवण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. १ चमचा बेसन पीठ आणि १ चमचा मसूर डाळीचे पीठ घ्या. यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि १ चमचा ताजा कोरफडीचा गर मिसळावा. शेवटी मिश्रण एकजीव करण्यासाठी दही किंवा कच्चे दूध घालावं.

Neck pigmentation

बेसन आणि मसूर डाळीचे फायदे

बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ करण्यास मदत करतं. मसूर डाळीचं पीठ मृत त्वचा काढून त्वचा मऊ आणि स्वच्छ बनवते. हे दोन्ही पदार्थ एकत्र वापरल्यास त्वचेचा नैसर्गिक उजाळा वाढण्यास मदत मिळते.

Home remedies for dark neck

लिंबू आणि हळदीचा परिणाम

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होते. हळद त्वचेला स्वच्छ ठेवण्यास आणि त्वचेवरील जंतू कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Summer skincare

कोरफड आणि दही

कोरफडीचा ताजा गर त्वचेला थंडावा देतो आणि त्वचा कोरडी पडू देत नाही. दही किंवा कच्चं दूध त्वचेचं पोषण करून त्वचा मऊ बनवण्याचं काम करतं. त्यामुळे ही पेस्ट लावल्यानंतर मान अधिक स्वच्छ दिसते.

Natural skin care

लेप कसा लावावा?

तयार केलेला लेप मानेला लावून हलक्या हाताने चोळावा. त्यानंतर हा लेप साधारण १० मिनिटे मानेवर तसाच ठेवावा. नंतर थोडे पाणी लावून पुन्हा हलक्या हाताने मसाज करत लेप धुवून टाकावा.

Besan face pack

उपाय किती वेळा करावा?

हा उपाय आठवड्यातून एकदा नियमित केल्यास चांगला परिणाम दिसू शकतो. सतत वापर केल्याने मानेवरील डेड स्किन आणि काळेपणा कमी होण्यास मदत मिळते.

Lemon for skin

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा