

आरोग्य विभागात काम करु पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. नाशिक महापालिकेत आरोग्य अग्निशमन विभागात ५८७ जागांसाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही भरती प्रक्रिया दिवाळीनंतर सुरु होईल.
या संदर्भातील परीक्षेचा प्रस्ताव हा प्रशासनाने आयुक्तांकडे पाठवला आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेत पाठवला जाणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वीच महापालिकेत भरतीची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असे म्हटले जात आहे.
यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अग्निशमन, आरोग्य आणि वैद्यकीय विभासाठी ६७१ पदांना भरतीसाठी मंजुरी दिली होती. सध्या ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येत असून टीसीएस कंपनीत भरती (Recruitment) सुरु होऊ शकते.
यामध्ये आरोग्य आणि अग्निशामक विभागातील पदांसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. टीसीएस कंपनी परीक्षा घेत असली तरी त्याचे स्वरुप महापालिका ठरवेल. यामध्ये वैद्यकीय, अग्निशामक आणि घनकचरा विभागाकडून परीक्षेचे स्वरुप मागवण्यात आले. अग्निशामक विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ पदांच्या भरतीसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे असे पालिकेने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.