Tea Can Causes Cancer: सकाळी चहा पिण्याची सवय आहे? जडू शकतो कर्करोगासारखा गंभीर आजार, या लोकांनी तर चुकूनही पिऊ नका

Cancer Risk : तुमची सकाळी चहा पिण्याची ही सवय घातक ठरु शकते. यामुळे तुम्ही कर्करोगासारख्या गंभीर आजाराला बळी पडू शकता.
Tea Can Causes Cancer
Tea Can Causes CancerSaam Tv
Published On

Cancer Symptoms : जगभरात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढ आहेत. सर्व वयोगटातील लोक या आजाराला बळी पडत आहे. या आजाराबाबत अनेक समज व गैरसमज देखील आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा बळी जातो.

पण तुम्हाला माहित आहे का? तुमची सकाळी चहा पिण्याची ही सवय घातक ठरु शकते. यामुळे तुम्ही कर्करोगासारख्या गंभीर आजाराला बळी पडू शकता. जर तुम्हालाही प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्याची सवय असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकच्या कपांमध्ये हायड्रोकार्बन्स असतात. या कपांमध्ये चहा गेल्यावर हा धोकादायक हायड्रोकार्बन चहामध्ये मिसळतो. असा चहा प्यायल्यामुळे आपल्याला कर्करोगासारखा गंभीर आजार जडू शकतो.

Tea Can Causes Cancer
Benefits Of Morning Walk: दररोज मॉर्निंग वॉक करणे फायदेशीर आहे का?

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकच्या कपमध्ये चहा (Tea) पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषतः दुकाने किंवा रेस्टॉरंटमध्ये चहा प्लास्टिकच्या कपमध्येच दिला जातो. दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागातील एचओडी डॉ. विनीत तलवार म्हणतात की, जेव्हा प्लास्टिकचे भांडे गरम केले जातात तेव्हा त्यातून हायड्रोकार्बन्स बाहेर पडतात. त्यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका संभवतो. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येही असाच धोका आहे. यामध्ये पाणी जास्त काळ राहिल्यास ते प्लास्टिकमध्ये असलेल्या हायड्रोकार्बन्सच्या संपर्कात येते. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ते त्यातून शरीरात प्रवेश करते.

1. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका

प्लास्टिकच्या बाटलीतही डायऑक्सिन रसायन असल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे डॉ.तलवार यांनी स्पष्ट केले. ज्या प्लास्टिकच्या भांड्यात लोक ज्यूस पितात तेही हाय डेन्सिटी पॉलीथिलीनचे बनलेले असतात. त्यामुळे अनेक प्रकारची घातक रसायने आहेत. या रसायनामुळे शरीरात कर्करोग पसरू शकतो.

Tea Can Causes Cancer
Drinking Hot Water Morning Benefits: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे माहितेय का?

2. रात्री उशिरा जेवल्याने देखील कर्करोग होतो

केवळ चहाच नाही तर रात्री उशिरा खाल्ल्यानेही कर्करोग होऊ शकतो. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर हेल्थच्या संशोधनानुसार खाणे आणि झोपणे यामध्ये दोन तासांचे अंतर असावे. पण आजकाल लोक रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात. त्यामुळे जेवण आणि झोप यात अंतर राहत नाही. त्यामुळे पोटाचे आरोग्य (Health) बिघडते. ते खराब झाल्यामुळे शरीरातील पेशींची असामान्य वाढ होण्याचा धोका असतो. पेशींच्या या वाढीमुळे कर्करोग होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com