कोमल दामुद्रे
सकाळी लवकर चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचे फायदे आपण जाणून घेऊया
दररोज सकाळी चालण्याने स्नायू आणि हाडे निरोगी राहतात, ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
रोज मॉर्निंग वॉक केल्याने संपूर्ण शरीराला समान प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यामुळे रक्ताभिसरण बरोबर राहते.
रोज सकाळी चालण्याने शरीरात ऊर्जा येते आणि काम केल्यासारखे वाटते.
बऱ्याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, जे लोक रोज मॉर्निंग वॉकसाठी जातात त्यांच्यामध्ये नैराश्य आणि तणाव यासारख्या समस्या कमी सामान्य असतात.
सकाळी चालण्याने रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रित राहते. अशा परिस्थितीत हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप कमी होतो.
मॉर्निंग वॉक केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
वॉकने शरीराला ऊर्जा तर मिळतेच, पण त्यामुळे त्वचेच्या पेशीही निरोगी होतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
रोज सकाळी चालण्याने चरबी बर्न होते. आहारावर नियंत्रण ठेवून रोज मॉर्निंग वॉक केल्यास वजन लवकर कमी करता येते.