Monsoon Travel : मुंबईजवळ काश्मीरचा फील, फक्त २ हजारांत पार्टनरसोबत रोमँटिक टूर करा प्लान!

Best budget tourist destinations Near Mumbai : पावसाळ्याचे औच्यित साधत अनेकजण फिरण्याचा प्लान करत असतात,त्यात सध्या लॉंग विकेंडही आला आहे.या वेळी मग तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणी नक्की जाण्याचा प्लान करा.
Best budget tourist destinations Near Mumbai
Monsoon TravelSaam Tv
Published On

कालच देशभरात स्वातंत्र्यदिन पार पडला आहे. स्वातंत्र्यदिन आणि लागोपाठ सुट्ट्या आल्याने प्रत्येकजण पिकनिकचे प्लान करत आहेत. कारण गेल्या २ ते ३ दिवसांपासून लॉंग विकेंड सुरु झाला आहे. अनेकांना सुट्ट्या आहेत तर काही व्यक्ती सुट्टी घेत आहे. तुम्ही सुद्धा येणाऱ्या शनिवार,रविवार आणि सोमवारची रक्षाबंधनची सुट्टी,अशा तीन दिवसाच्या सुट्ट्या घेऊन तुमच्या जोडीदारासोबत प्लान करा फिरायला जायचा. तुम्ही जोडीदारासोबत वीकेंडसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधत आहात तर, महाराष्ट्रातील या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या.

Best budget tourist destinations Near Mumbai
Monsoon Travel : पावसाळ्यात गड-किल्ले चढायचा आनंद लुटा, लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन

माथेरान- जर तुम्ही मुंबई आणि मुंबईजवळच्या परिसरात वास्तव्यास असाल तर अगदी काही तासाभराच्या अंतरावर अतिशय सुंदर असे माथेरान हे पर्यटन स्थळ आहे. दरदिवशी हजारो पर्यटक कुटुंबासह तर तुम्ही येथे जाऊ शकता शिवाय जोडीदारासोबत येथे फिरण्यासाठी जाऊ शकतात.माथेरान या ठिकाणाली महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर (Mahabaleshwar)म्हणून देखील ओळखले जाते.

अलिबाग- मुंबईपासून काही अंतरावर असलेले अलिबाग या ठिकाणी तुम्ही विकेंडसाठी प्लान करु शकता. महाराष्ट्र राज्यातील हे ठिकाण अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन (Tourism) स्थळ म्हणून ओळखले जाते. येत्या विकेंडसाठी हे ठिकाण अतिशय बेस्ट ठरेल.

इगतपुरी- जर जोडीदारासोबत विकेंड प्लान करत असाल तर इगतपुरी हे ठिकाणही अतिशय बेस्ट ठरेल. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंब शिवाय अनेक मित्रमंडळी या ठिकाणी येत असतात. इगतपुरी हे ठिकाण पावसाळ्यात अतिशय मनमोहक दिसून येते शिवाय सोबत छोटे-मोठे धबधबे याला अजूनच सौदर्यं लाभते.

माळशेज घाट - जर तुम्ही या विकेंडला बाहेर पडत असाल तर माळशेज घाटावर नक्की जायला हवे.सध्या लॉंग विकेंड असल्याने माळशेज घाटात पर्यटकांची मोठी गर्दी(crowd) पाहायला मिळते. या ठिकाणी भल्या मोठ्या डोंगरावरुन जमिनीवर कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य काही अप्रतिम असे दिसते.

Best budget tourist destinations Near Mumbai
Monsoon Travel : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सुंदर धबधबा, फोटोप्रेमींसाठी पर्वणीच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com