CBD Belapur Tourism : नवी मुंबईतील दैदिप्यमान गोल्डन पॅगोडा; वास्तूपाहून भारावून जाल, वाचा कसं जायचं?

Navi Mumbai Pagoda : विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांची येथे सुबक मूर्ती आहे. त्यांची प्रतिमा पाहून अगदी मन प्रसन्न होते आणि काहींना भारावून गेल्यासारखे देखील वाटते.
Navi Mumbai Pagoda
CBD Belapur TourismSaam TV
Published On

नवी मुंबईमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यामध्ये विविध धर्मियांची मंदिरे देखील आहेत. यातीलच एक गोल्डन पॅगोडा. बौद्ध धर्मातील आणि सर्वच भारतीयांसाठी हे मोठं श्रद्धास्थान आहे. नवी मुंबईमध्ये पाहण्यासारखी विविध ठिकाणे आहेत. यातील गोल्डन पॅगोड्याला तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

Navi Mumbai Pagoda
Pune Monsoon Tourism Places : मुसळधार पावसात फिरण्यासाठी पुण्यातील खास ठिकाणं; एकदा भेट द्याल तर भारावून जाल

वातावरण

नवी मुंबईमधील हा गोल्डन पॅगोडा येथील वास्तूमुळे ओळला जातो. येथे तु्म्हाला सर्वत्र शांतता पाहायला मिळेल. विविध शहरांतून अनेक व्यक्ती या ठिकाणी मेडिटेशनसाठी येत असतात. येथे आल्यावर मन अगदी प्रसन्न आणि शांत होते.

विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांची येथे सुबक मूर्ती आहे. त्यांची प्रतिमा पाहून अगदी मन प्रसन्न होते आणि काहींना भारावून गेल्यासारखे देखील वाटते. तसेच येथे आसपास सर्वत्र गौतम बुद्धांच्या काळातील आणि त्यांच्या जीवनातील घडामोडींवर आधारीत चित्र, फोटो लावण्यात आले आहेत. येथील भींतींवर तुम्हाला बुद्धांचा इतिहास माहित करून घेता येईल.

कसं जायचं?

नवी मुंबईतील गोल्डन पॅगोडा जाणे फार सोप्प आहे. नवी मुंबईच्या बेलापूर या स्थानकात हा पॅगोडा आहे. गौतम कॉम्पेक्स, सेक्टर ११, सेक्टर ३०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई असा येथील पत्ता आहे.

तुम्हाला येथे जायचे असल्यास बेलापूर स्थानकात उतरावे लागेल. येथून तुम्ही ऑटोने थेट पॅगोडापर्यंत जाऊ शकता. येथे बस देखील जातात, त्यामुळे तुम्ही हा ऑप्शन सुद्धा निवडू शकता.

Navi Mumbai Pagoda
Navi Mumbai Building collapsed : सीबीडी बेलापूरमधील शहाबाज गावात ४ मजली इमारत कोसळली; थरकाप उडवणारे PHOTO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com