आज जुलै महिन्याचा शेवटचा म्हणजे मुसळधार पाऊस कोसळण्याचा शेवटचा महिना आहे. यापुढे पाऊस कमी कमी होत जाणार. असे असले तरी तु्म्ही अजूनही पावसाळी सहल काढली नसेल तर ती आज करू शकता. पावसाळी सहल किंवा ट्रिपसाठी तुम्ही पुण्याला भेट देऊ शकता. पुण्यात पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक भन्नाट आणि मनमोहक ठिकाणं आहेत. त्यांची माहिती आज जाणून घेणार आहोत.
सिंहगड किल्ला
ट्रेकिंगसाठी सिंहगड फार प्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी उभा डोंगर चढावा लागतो. त्यामुळे या दिवसांत येथे बऱ्याच ठिकाणी धबधबे वाहत असतात. सिंहगड किल्ल्याचं रुप या दिवसांत अगदी सिंहा सारखं भासतं. खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची एका क्षणासाठी भीती देखील वाटते.
कोयना वन्यजीव अभयारण्य
तुम्ही कुटुंबासह कुठे फिरण्याचा विचार करत असाल तर कोयना वन्यजीव अभयारण्य सुद्धा बेस्ट प्लेस आहे. या अभयारण्यात पावसामुळे सर्वत्र हिरवीगार झाडी पसरते. तसेच येथे तुम्हाला विविध वन्यजीव पाहता येतील. कुटुंबातील व्यक्तींसह किंवा मित्रांसह सुद्धा या भन्नाट जागेला तुम्ही भेट देऊ शकता. पुण्यापासून 110.3 किमी अंतरावर कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. पुण्याहून येथे पोहचण्यासाठी अंदाजे 3 तास लागतात.
मुळशी डॅम
पावसाळ्यात फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणांपैकी पुण्यातील मुळशी डॅम एक आहे. भारतातील मुळा नदीवरील प्रमुख धरण म्हणून या डॅमचं नाव मुळशी असं आहे. पुण्यापासून मुळशी डॅम गाठण्यासाठी बाय रोड ४५ किलोमीटर अंतर पार करावं लागेल. टाटा पॉवर संचालित भिरा जलविद्युत प्रकल्पात सिंचनासाठी तसेच वीज निर्मितीसाठी मुळशी डॅममधील पाणी वापरलं जातं.
कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखरावर एकदा तरी जावं असं अनेकांचं स्वप्न असतं. यंदाच्या पावसाळ्यात हे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. दरवर्षी या ठिकाणी अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येथे येत असतात. कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.
खडकवासला धरण
खडकवासला धरणावर सुद्धा अनेक पर्यटक फिरण्यासाठी जातात. यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही येथे वन डे रिटर्न अशी ट्रिप काढू शकता. मुथा नदीवर पुण्यापासून २१ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.