Monsoon Travel : पावसाळ्यात गड-किल्ले चढायचा आनंद लुटा, लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन

Rajmachi Trekking : पावसाळ्यात कुटुंबासोबत जवळच वीकेंड प्लान करत असाल तर लोणावळ्यात राजमाची किल्ला बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद देखील लुटू शकता.
Rajmachi Trekking
Monsoon TravelSAAM TV
Published On

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात राजमाची किल्ला आहे. हा किल्ला व्यापारी मार्गाचे नियंत्रण ठेवण्यासाठी होता असा इतिहास आहे. मुंबई-पुणे मार्गावरील खोपोली आणि खंडाळा दरम्यानच्या बोर घाटावर नियंत्रण ठेवणारा हा एक मोक्याचा किल्ला होता. या किल्ल्यामध्ये श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन बालेकिल्ले आहेत. राजमाची किल्लाच्या पश्चिम भागावर बौद्ध लेणी आहेत. या लेण्यांना 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये बोर घाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना आणि विसापूर हे सर्व किल्ले स्वराज्यात आणले.

राजमाची किल्ला समुद्रसपाटीसून 3 हजार फूट उंचावर आहे. राजमाची हा सोपा ट्रेक असून नवीन ट्रेकिंगचा अनुभव घेणाऱ्या माणसासाठी अतिशय योग्य आहे. मात्र किल्ला पूर्ण करण्यासाठी भरपूर चालावे लागते. पावसाळ्यात किल्ल्यावर ट्रेकिंग करणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हरवून जाणे. या किल्ल्यावर उदयसागर तलाव, कातळधार धबधबा, ड्यूक्स नोज, ढाकबहिरी, शिरोटा तलाव अनुभवायला मिळेल. त्यामुळे आजच्या या लेखात, आम्ही तुम्हाला राजमाची किल्ल्यावरील संपूर्ण माहिती देतो आहेत. तुम्हालाही पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर ही माहिती वाचाच.

पहाण्याची ठिकाणे

उदयसागर तलाव

गडावर असलेला उदयसागर तलाव नयनरम्य दृश्यांचा आनंद देतो. तलावाच्या समोर खाली उतरून गेल्यावर एक मोठे पठार लागते. या पठारावरून दरीतून पडणार्‍या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते.

श्रीवर्धन

राजमाची गडावर असणार्‍या दोन बालेकिल्ल्यांपैकी एक म्हणजे श्रीवर्धन. या बालेकिल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आहे. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका आणि शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.

मनरंजन

उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणार्‍या मनरंजन या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. या बालेकिल्ल्याचा दरवाजा गोमुखी आहे. बालेकिल्ल्यावर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईशाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक दिसते.

शंकराचे मंदिर

तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख आहे त्यातले पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते.

Rajmachi Trekking
Raksha Bandhan Special : यावर्षी रक्षाबंधन कोकणात करा सेलिब्रेट, अनुभवा डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा

  • मुंबईहून CSMT रेल्वे स्थानकावर पुणे जंक्शनसाठी एक्सप्रेस पकडा. त्यानंतर लोणावळा स्टेशनवर उतरा. बसने लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची या गावात उतरा. या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी 5 तास लागतात.

  • मुंबईहून CSMT रेल्वे स्थानकावर कर्जतसाठी लोकल पकडा. त्यानंतर कर्जतला उतरून बस पकडून कोंदीवडे या गावात उतरा. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तास लागतात.

राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय

राजमाची गडाच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडी गावात राहण्याची उत्तम सोय होते. तसेच गडावर असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात आणि गडावर असलेल्या गुहेतही राहता येते. राजमाची गावात आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडी गावात जेवणाची उत्तम सोय आहे.

गडावर जाताना 'या' गोष्टी सोबत ठेवा

टॉर्च किंवा मोबाईल फोनसाठी पॉवरबँक सोबत ठेवा. पाणी किमान दोन ते तीन लिटर सोबत ठेवा. पावसाळ्यात ट्रेकिंगला गेल्यास चांगले ट्रेकिंग शूज घाला. राजमाची गडावर मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे शक्यतो अंधार होण्याच्या आधी खाली उतरा. राजमाचीवर जाण्यासाठी साधारणपणे पाच तास लागतात त्यामुळे खाण्यासाठी काहीतरी ठेवा. तसेच ORS पावडर सोबत असू द्या.

Rajmachi Trekking
Madhya Pradesh Tourism : पावसाळ्यात बाहेर फिरण्यासह अ‍ॅडवेंचर पण करायचंय? मग मध्य प्रदेशमधील असं ठिकाण अन्य कुठेच सापडणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com