पावसाळा अजूनही संपलेला नाही. आता तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राबाहेर पावसाळी ट्रिपला जायचं आहे? मात्र पावसाचा आनंद घेत अॅडवेंचर आणि सेफ ठिकाण तुम्ही शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ते ठिकाण शोधलं आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी मध्य प्रदेश अगदी खास, सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे. दर वर्षी येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. मध्य प्रदेश पर्यटकांसह इतिहास प्रेमी आणि अॅडवेंचरची आवड असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा बेस्ट आहे.
शिवपुरी
मध्य प्रदेशमधील शांतता आणि सुंदरतेने शिवपुरी हे शहर भरलं आहे. येथील सुरवाया किल्ला पाहण्यासारखा आहे. इतिहासाबद्दल जाणून घेण्याची आवड असेल तर येथे भेट देऊ शकता. येथील भिंती आणि मंदिराच्या अवशेषांवर प्राचीन काळाशी संबंधित अनेक माहिती आहे. शिवपुरीमध्ये माधव नॅशनल पार्क नारवार किल्ला, बधैया कुंड पाहण्यासारखे आहे.
दतिया
मध्य प्रदेशमधील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे दतिया. येथील पितांबरा पीठ हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. अनेक भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्यता अगदी मनमोहक आहे. येथे आल्यावर मन अगदी शांत आणि प्रसन्न होते.
ओरछा
ओरछामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या पावसाळी सुट्ट्या एन्जॉय करू शकता. या शहरात लक्ष्मी नारायण मंदिर आहे. मंदिराच्या भिंतींवर असलेलं कोरीवकाम तुम्ही या आधी दुसरं कुठेच पाहिलं नसेल. तुम्ही येथे फोटोशूट सुद्धा करू शकता. या ठिकाणी बुंदेला राजा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आठणी जतन करण्यासाठी काही स्मारके येथे तुम्हाला पाहायला मिळतील. ओरछामध्ये डोळ्यांना अद्भूत वाटेल असं एक पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. येथे तुम्हाला विविध पक्षी आणि झाडे पाहायला मिळू शकतात.
मोरेना
काही व्यक्तींना पशू-पक्षी, प्राणी फार आवडतात. तुम्हालाही अशी आवड असेल तर राष्ट्रीय चंबळ अभयारण्य तुम्हाला नक्की आवडेल. येथे तुम्हाला निसर्गातील अनेक दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतील. मगर तसेच लाल मुकुटमध्ये असलेला कासव सुद्धा मिळेल. गंगा नदीत तुम्हाला डॉल्फिन सुद्धा पाहता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.