Madhya Pradesh News
Madhya Pradesh NewsGoogle

Madhya Pradesh News: धक्कादायक! आईने फिरायला घेऊन जाण्यास नकार दिला, रागाच्या भरात १० वर्षीय मुलीने संपवलं जीवन

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशमध्ये एका दहा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जबलपूरमध्ये ही घटना घडली आहे. गुरुवारी गळफास लावून या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये एका दहा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जबलपूरमध्ये ही घटना घडली आहे. गुरुवारी गळफास लावून या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. आईने ट्रिपला घेऊन जाण्यासाठी नकार दिला म्हणून मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यामुळे १० वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. ही मुलगी पाचवीत शिकत होती. तिने घरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या भेडाघाट येथे फिरायला घेऊन जाण्याचा हट्ट केला. परंतु तिच्या आईने फिरायला जाण्यास नकार दिला. त्याचाच राग मनात धरुन मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आईने फिरायला जाण्यास नकार दिल्यावर मुलीने घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस याप्रकरणी पुढील तपास कत आहेत.

Madhya Pradesh News
Nagpur Crime: भावी खासदार कोण होणार? पारावर चर्चा सुरू असतानाच तरुणांमध्ये राडा; एकाचा जागीच मृत्यू

याआधीही मध्यप्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली होती. आपल्या होणारा नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. याप्रकरणी आरोपीविरोधात एफआयआर दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

Madhya Pradesh News
Nashik Crime: शनि शिंगणापूरमधून पंचवटीमधील पाच जणांना अटक; भद्रकाली पोलिसांची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com