Maghi Ganpati 2024 : माघी गणेशोत्सव कधी आहे? कसे कराल बाप्पाला प्रसन्न? अशी करा पूजा
Maghi Ganpati Date 2024 :
माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. याला तिलकुंद चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. यादिवशी बाप्पाची विधीवत पूजा केल्याने प्रसन्न होऊन आशिर्वाद मिळतो.
यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये साजरी (Celebrate) केली जाणार आहे. १२ फेब्रुवारी सायंकाळी ५.४६ मिनिटांनी चतुर्थी सुरु होणार आहे. १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी संपेल.
महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये (Home) ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. यादिवशी श्रीगणरायची विधिवत पूजा करुन व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. जीवनात सुख-समृद्धी टिकून राहाते.
वरद तिलकुंड चतुर्थी म्हणून ओळखले जाते की, या गणेश चतुर्थीला गणपतीला तिळाचे लाडू अर्पण केले जातात. माघ मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता. म्हणून ही जन्म तिथी माघी गणेश (Ganpati) जयंती म्हणून ओळखली जाते.
1. गणेश पूजा मुहूर्त
१३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे.
2. शुभ योग
गणेश जयंतीदिवशी सिद्ध योग रात्री २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ होणार आहे. या दिवशी गौरी तृतीया व्रत सुद्धा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

