कोमल दामुद्रे
त्रिशुंड गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे.
पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे.
तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराजांची समाधी आहे.
हे मंदिर भीमगीरजी गोसावी महंतानी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले.
गणपतीच्या मूर्तीची मूर्तीची बैठक चौकोनी असून मयूरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे.
तीन शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदकपात्रास स्पर्श करीत आहे.
मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करीत आहे.