कोमल दामुद्रे
नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.
या ठिकाणी असे अनेक पर्यटनस्थळे आहेत जे पर्यटकांना भूरळ पाडतात.
जर तुम्ही देखील नाशिकमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. ज्यामुळे या ठिकाणी बारा वर्षांतून एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यात येतो.
रामकुंड हे ठिकाण नाशिकमधील गोदावरीच्या पात्रात बांधण्यात आलेलं आहे.
नाशिकमधील रामवाडी पूलाजवळ गोदापार्क आहे. जे पर्यटकप्रेमींना भूरळ पाडते.
नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांमध्ये 108 शक्ति पीठांचा उल्लेख आहे.
नाशिक शहरात पंचवटी हे गोदावरीच्या डाव्या तीरावर वसलेलं एक ठिकाण आहे.
नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे. भगवान रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे.