कोमल दामुद्रे
भारतात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे आपल्याला बजेटमध्ये फिरता येते. जाणून घेऊया त्याबद्दल
ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे.
प्रसिद्ध मंदिरे, योगाश्रम, ऑफबीट ठिकाणे, कॅफे यासाठी अधिक प्रसिद्ध आहे.
राजेशाही पार्श्वभूमी, भव्य वास्तुकला आणि संस्कृतीने परिपूर्ण असलेले जयपूर. पर्यटकांसाठी बजेटमध्ये फिरता येणारे हे ठिकाण आहे.
हे शहर आलिशान हॉटेल्स आणि निवासस्थानासाठी ओळखले जाते. तसेच वसतिगृहे, गेस्ट हाऊस आणि कमी बजेटमध्ये राहाण्याचे पर्याय आहेत.
कसोल हे हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन आहे आणि बॅकपॅकर्ससाठी उत्तम ठिकाण आहे. कसोलमध्ये अनेक होमस्टे, वसतिगृहे आणि स्वस्त हॉटेल्स आहेत.
गोवा हे पॉकेट फ्रेंडली ठिकाण आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी बीच आणि चर्च आहेत.