कोमल दामुद्रे
नाशिकमधील पंचवटीत काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध काळाराम मंदिर आहे.
या मंदिराजवळ असे अनेक पर्यटनस्थळे आहेत जे पर्यटकप्रेमींना भूरळ पाडतात. जाणून घेऊया त्याबद्दल
रामकुंड हे नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बस स्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या रामशेज किल्ला. नाशिक शहराच्या उत्तरेला १४ कि.मी. अंतरावर आहे.
देवी लक्ष्मी आणि तुलसी यांच्यासमवेत असलेले भगवान विष्णू यांचे एकमेव सुंदर नारायण मंदिर रविवार कारंजा येथे गोदावरी नदी किनाऱ्याजवळ आहे.
सीता गुंफा हे नाशिक शहरातील पंचवटी येथील एक प्रेक्षणीय स्थान आहे. राम, सीता यांनी वनवासात असताना येथे आसरा घेतला होता.
गोदावरी या नदीच्या किनारीच पंचवटी आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास पंचवटी असे म्हटले जाते.