Shraddha Thik
महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
तब्बल 22 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतूचे लोकार्पण आज 12 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
या ट्रान्स हार्बर लिंकमुळे तासांचा प्रवास काही मिनिटांत होणार आहे. मात्र या लांबलचक सागरी सेतूवर काहीच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
हा देशातील सगळ्यात मोठा सागरी सेतू असून जगात 12 व्या क्रमांकावर आहे.
या ठिकाणी कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनिबस, बस या सर्व वाहनांना परवानगी असणार आहे.
सागरी सेतूच्या या चढ आणि उताराची वेगमर्यादा 40 किलोमीटर प्रति तास एवढी ठरवण्यात आली आहे.
मोटरसायकल, मोपेड आणि तिनचाकी वाहने, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, जनावर वाहून नेणारी वाहने तसेच कमी गतीने चालणाऱ्या वाहनांवर सागरी सेतूवर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे.