
ओट्स, मेथी, अळशी आणि जास्वंद हे स्ट्रॉलेस्ट्रॉल कमी करणारे नैसर्गिक घटक आहेत.
नियमित सेवनाने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
योग्य आहार आणि व्यायामासोबत हे पेय घेणे सर्वात प्रभावी ठरते.
हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. पण काही घरगुती उपाय नियमित पद्धतीने वापरल्यास या त्रासाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी करता येते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि फायबरयुक्त पेय हे त्रिकूट तुमच्या हार्ट हेल्थसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या अशी ५ घरगुती ड्रिंक्स जी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
1 ओट्स-ॲपल स्मूदी
ओट्समध्ये असलेले बेटा-ग्लुकान फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करते. त्यासाठी २–३ टेबलस्पून भिजवलेले ओट्स, १ लहान सफरचंद, २०० मि.ली. दूध किंवा दही, थोडी दालचिनी एकत्र ब्लेंड करा. साखर टाकू नका. दररोज सकाळी नाश्त्यात याचे सेवन करा.
२ टोमॅटो छास (बटरमिल्क)
टोमॅटोतील लायकोपीन हे घटक हृदयासाठी फायदेशीर असते. छास प्रोटीन देते आणि सॅच्युरेटेड फॅट कमी ठेवते. त्यासाठी अर्धा कप दही, १ कप पाणी फेटून त्यात अर्धा ब्लेंड केलेला टोमॅटो, भाजलेले जिरे, कोथिंबीर आणि मिरी टाका. दुपारच्या जेवणात ५ ते ६ दिवस सलग हे पेय घ्यावे.
३ हिबिस्कस टी
हिबिस्कस म्हणजे जास्वंद. यामध्ये ॲंथोसायनिन्स आणि पॉलिफेनॉल्स असतात जे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यासाठी १–२ टीस्पून सुके हिबिस्कस फूल उकळत्या पाण्यात ५–७ मिनिटे ठेवा. गाळून त्यात थोडं आलं किंवा दालचिनी टाका. दुपारी किंवा संध्याकाळी, आठवड्यातून ५ दिवस नियमित हे पेय पित राहा.
४. मेथीचं पाणी
मेथीत असलेले सोल्युबल फायबर आणि सॅपोनिन्स हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यासाठी १ टीस्पून मेथी दाणे थोडेसे ठेचून रात्री २०० मि.ली. पाण्यात भिजवा. सकाळी गाळून प्या. सुरुवातीला आठवड्यात ४–५ दिवस घ्या, नंतर हळूहळू वाढवा.
५. फ्लॅक्ससीड-जिरे ड्रिंक
अळशी (Flaxseed) मध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर असतात जे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड कमी करतात. त्यासाठी १–२ टीस्पून अळशी भाजून बारीक करून ती २०० मि.ली. पातळ छासात किंवा पाण्यात जिरे टाकून मिसळा. लगेच प्या. जेवणासोबत दररोज एकदा हे पेय घ्या.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय?
कोलेस्टेरॉल हा शरीरातील एक प्रकारचा फॅट आहे.
कोलेस्ट्रॉल कशाने वाढतो?
चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, आणि तणाव यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढतो.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते घरगुती पेय उपयोगी आहेत?
ओट्स स्मूदी, टोमॅटो छास, हिबिस्कस टी, मेथी पाणी आणि अळशी-जिरे ड्रिंक हे अत्यंत फायदेशीर आहेत.
हे पेय किती दिवस घ्यावेत?
नियमित ३ महिन्यांपर्यंत दररोज यापैकी एखादे पेय घेतल्यास कोलेस्टेरॉल नैसर्गिकरीत्या कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.